Banana farming 
ऍग्रो वन

दक्षिण भारतातील केळी वाणाची लागवड; चोपडा तालुक्‍यातील शेतकऱ्याचा प्रथमच प्रयोग

दक्षिण भारतातील केळी वाणाची लागवड; चोपडा तालुक्‍यातील शेतकऱ्याचा प्रथमच प्रयोग

संजय महाजन

जळगाव : जळगाव बनाना म्‍हणजे बनाना सिटी म्‍हणून प्रसिद्ध आहे. जिल्‍ह्यात केळीचे उत्‍पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असून, विदेशात देखील जिल्‍ह्यातून केळीची निर्यात केली जाते. परंतु, जिल्‍ह्यात पिकविल्‍या जाणाऱ्या केळीची लागवड न शेतकऱ्याने करता प्रयोग म्‍हणून दक्षिण भारतातील केळी वाणाची लागवड केली आहे. (jalgaon-news-banana-farming-Cultivation-of-banana-variety-in-South-India)

जळगाव जिल्हा संपूर्ण देशात केळीसाठी प्रसिद्ध आहे. देशांतर्गत केळीची मागणी पाहता जळगावच्या केळीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळत आहे. जून २०२१ या काळात जळगाव जिल्ह्यातून तब्बल २२ मेट्रिक टन केळी दुबईला निर्यात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील तांदळवाडी गावातील उत्पादक शेतकऱ्यांकडून हा माल निर्यात करण्यात आला आहे. जळगावच्या केळीला भौगोलिक नामांकन (जीआय-जीऑग्रॉफील इंडिकेशन) मिळाले आहे. देशातील केळी उत्पादनात जळगावचा वाटा १६ टक्के आहे.

प्रथमच प्रयोग

वढोदा (ता. चोपडा) येथील शेतकरी संदीप सुभाष पाटील हे केळीचे सातत्‍याने उत्‍पादन घेत आहेत. उत्‍पादन घेत असताना नवनवीन प्रयोग करत राहणे त्‍यांना आवडते. यातच त्‍यांनी सहा महिन्‍यांपुर्वी नवा प्रयोग करत ‘एलक्‍की’ या केळीच्‍या वाणाची लागवड केली आहे. चार हजार खोडांची लागवड केली आहे. या केळीचे उत्‍पादन हे प्रामुख्‍याने दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात घेतले जात असते. जळगाव जिल्‍ह्यात या वाणाच्‍या केळीची प्रथमच लागवड केली आहे.

१८ किलोपर्यंत रास अपेक्षित

आकाराने लहान व गोड असलेली ‘एलक्‍की’ या वाणाची केळी दक्षिण भारतात घेतली जाते. त्‍या ठिकाणी केळीचे खोडाची उंची कमी राहत असल्‍याने केळीच्‍या घडाची रास १२ ते १३ किलोपर्यंत उतरत असते. मात्र वढोदा येथील शेतकरी संदीप पाटील यांनी सहा महिन्‍यांपुर्वी लागवड केलेली केळी उंच वाढली असून, त्‍यानुसार १७ ते १८ किलोची रास उतरणे अपेक्षित आहे. तसेच केळीला चार हजार रूपयांचा भाव मिळणे देखील अपेक्षित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep deprivation: कमी झोप घेताय? शरीर देतंय धोक्याचे सिग्नल, वेळेत सांभाळा स्वतःला

Diwali Padwa Marathi Wishes: दिवाळी पाडवानिमित्त व्यक्त करा आपले प्रेम! आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: पाडव्याच्या मुहूर्तावर नवा गूळ बाजारात दाखल

Pooja Sawant Photos: कानात झुमके अन् हातात हिरव्या बांगड्या, अभिनेत्री पुजाचं दिवाळी फोटोशूट

Accident News : दिवाळीत अपघाताचा थरार! भरधाव वाहनाने चौघांना चिरडलं, तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT