Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price: ‘खरिपा’तील ८० टक्के कापूस पडून; शेतकऱ्यांवर वाढतोय कर्जाचा डोंगर

‘खरिपा’तील ८० टक्के कापूस पडून; शेतकऱ्यांवर वाढतोय कर्जाचा डोंगर

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : खरीप हंगामातील कापूस अद्यापही शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी नाही. परिणामी, दरही नाहीत. यामुळे (farmer) शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला प्रतिक्विंटल दहा ते १३ हजारांचा दर कापसाला मिळालेला नाही. खरीप हंगामातील ८० टक्के कापूस (Cotton) अद्यापही शेतकऱ्यांकडे पडून आहे. शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेल्या कर्जापोटी व्याजावर व्याजात रोज वाढ होत आहे. मात्र, कापसाला दहा हजारांचा दर मिळत नाही, अन्‌ शेतकरी कापूस विकत नाही. त्यामुळे कर्जांचा डोंगर आपल्या डोक्यावर चढवित असल्याचे विदारक चित्र आहे. (Breaking Marathi News)

‘पांढरे सोने’ म्हणून कापसाकडे शेतकरी नगदी सोने म्हणून पाहतात. यामुळेच खरीप हंगामात कापसाचा सर्वाधिक पेरा होतो. यंदा ११० टक्के पेरा कापसाचा झाला होता. कारण मागील वर्षी टंचाईमुळे कापसाला १३ हजारांचा दर मिळाला होता. यंदाही कापसाला मागणी राहील, दर किमान दहा हजार रुपये मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस पेरला. अतिवृष्टी झाली. त्यानंतरही उत्पादनही चांगले आले.

सुरवातीला १५ हजारापर्यंत दर

हंगाम येताना काही ठिकाणी कापसाला १५ हजार, १३ हजार व अकरा हजारांचा दर व्यापाऱ्यांनी दिला. शेतकऱ्यांना याच दराची अपेक्षा कायम राहिली. नंतर मात्र चांगला हंगाम हातात आला अन्‌ भाव आठ ते साडेआठदरम्यानच राहिले. दिवाळीत शेतकऱ्यांनी याच दरात काही प्रमाणात कापूस विकला. मात्र, किमान दहा हजारांचा दर मिळेल, या आशेने कापूस घरात साठविण्यात आला. सध्याही ८० टक्के कापूस शेतकऱ्यांचा घरात पडून आहे. कापसाचे उत्पादन घेताना झालेला खर्च कापूस विकून काढायचा, असे शेतकऱ्यांनी ठरविले होते. मात्र, दर दहा हजार नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस अद्यापपर्यंत विकलेला नाही.

५० जिनिंग बंद

बाजारात रोजची मागणी २० हजार गाठींच्या कापसाची आहे. मात्र, केवळ दोन हजार गाठींचा कापूस येत आहे. अजून किती दिवस कापसाचे दर कमी राहणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. जिल्ह्यात कापूसटंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यातील दीडशेपैकी केवळ ७५ जिनिंग प्रेसिंग मिल्स सुरू होत्या. आता त्यातील ५० जिनिंग बंद झाल्या आहेत, तर २५ जिनिंग बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT