Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : कर्जबाजारी शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon News : शेतकरी किसन यांनी शेतीसाठी कर्ज काढले होते. मात्र घेतलेले हे कर्ज फेडता येत नसल्याने ते खूप दिवसांपासून नैराश्यात होते

Rajesh Sonwane

जळगाव : शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या विचारातून कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. एरंडोल तालुक्यातील खेडगाव येथे हि घटना घडली असून उपचार सुरु असताना शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

खेडगाव (ता. एरंडोल) येथील किसन मोरसिंग राठोड (वय ४६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी किसन यांनी शेतीसाठी कर्ज काढले होते. मात्र घेतलेले हे कर्ज फेडता येत नसल्याने ते खूप दिवसांपासून नैराश्यात होते. शेवटी कर्जाला कंटाळून त्यांनी १५ जूनला घरी असताना विषारी द्रव प्राशन केले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. 

दरम्यान रुग्णालयात उपचार सुरु असताना १८ जूनला त्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच कुटुंबीयांनी रुग्णालयात (Farmer) एकच आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्नी लताबाई आणि अनिल व सुनील असे दोन मुले आहेत. जिल्हा पेठ पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ज्याला पाडायचे त्याला पाडा - मनोज जरांगे

Sunday: रविवारी करा 'या' वस्तूची खरेदी

Aishwarya-Avinash Narkar: दाक्षिणात्य गाण्यावर थिरकले नारकर कपल; लेक अन् जावयाचा भन्नाट डान्स पाहून वडिलांच्या चेहऱ्यावर आले हसू, पाहा VIDEO

Bengaluru School: खेळताना अंगावर पानी पडले, संतापलेल्या मॅडमने काठीने मारलं, पोराचे दात तुटले; गुन्हा दाखल!

Manoj Jarange : संभ्रम नकोच! ज्याला पाडायचं त्याला पाडा अन्..., मनोज जरांगेंचा एल्गार, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT