Heavy Rain Saam tv
ऍग्रो वन

Heavy Rain : जळगाव, धुळ्यात परतीचा जोरदार पाऊस; मका, ज्वारीचे मोठे नुकसान

Rajesh Sonwane

जळगाव/ धुळे : राज्यात सध्या पार्टीच्या पावसाचे आगमन झाले आहे. राज्यातील अनेक भागात दमदार पाऊस होत असून जळगाव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. तर धुळे शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. परतीच्या पावसाने अचानकपणे जोरदार हजेरी लावल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे.  

अमळनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस 

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. अमळनेर तालुक्यासह जिल्ह्यात अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान परतीच्या पावसामुळे मका, ज्वारी, बाजरी, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

धुळ्यात जोरदार पाऊस 

धुळे (Dhule) शहर व परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे काढणीला आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. त्यानंतर आता दोन दिवसानंतर आज देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे आता उर्वरित पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. ऐन पीक काढणीच्या वेळी या परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी राजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Darbhanga Express Acccident: तामिळनाडूमध्ये रेल्वे अपघात; दरभंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली

Dasara Melava 2024 : उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर धडाडणार, राज ठाकरे ऑनलाईन गरजणार; कोणावर निशाणा साधणार? VIDEO

Maharashtra News Live Updates: बुलढाण्यात एसटी बस आणि टिप्परचा अपघात, ७ जण गंभीर जखमी

Maharashtra Politics : स्टार प्रचारक, राज्यमंत्रिपद आणि आमदारकी; शरद पवार गटाकडून अमोल मिटकरींना जबर ऑफर? चर्चांना उधाण

Pune Crime: धक्कादायक! पुणे जिल्ह्यात गुंडांचा हौदास; व्यावसायिक तरुणाचा खून

SCROLL FOR NEXT