Chalisgaon News
Chalisgaon News Saam tv
ऍग्रो वन

Chalisgaon News : शेतकऱ्याने शेतात जात संपविले जीवन

Rajesh Sonwane

मेहुणबारे (जळगाव) : चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथील एका शेतकऱ्याने शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये (Chalisgaon) लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन यात्रा संपविल्याची घटना घडली- सदरची घटना २३ मार्चला सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)


चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथील ललित विनायक साळुंखे (वय ५६) हे २३ मार्चला सकाळी अकराच्या पूर्वी बहाळ शिवारातील शेतात गेले. या शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला (Farmer) त्यांनी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. शेतात असलेल्या काही जणांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी गावकऱ्यांना माहिती दिली. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आत्महत्येचे कारण अस्पष्ट 

ललित साळुंखे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान या प्रकरणी सुनील साळुंखे यांनी दिलेल्या माहितीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक गोपाल पाटील तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah: कलम ३७० ते रामलला दर्शन; अमित शहांनी राहुल गांधींना विचारले मोठे ५ प्रश्न

CBSE Board 10th Result 2024: CBSE १० वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली; परीक्षेचा निकाल जाहीर

Maharashtrian Dish: झणझणीत! तोंडाला पाणी सुटेल असा मिरचीचा ठेचा

Gharoghari Matichya Chuli : 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतील विवाहसोहळ्यात पैठणीची थीम; कलाकारांनी दिली पारंपरिक पोशाखाला पसंती

Maharashtra Election Voting LIVE : नंदुरबारमध्ये विक्रमी मतदान होण्याची शक्यता; १ वाजेपर्यंत ३७.३३ टक्के मतदान

SCROLL FOR NEXT