Watermelon crop : पाण्याअभावी टरबूज, खरबूज पीक धोक्यात; करपा रोगाचाही प्रादुर्भाव 

Nashik Manmad News : नाशिकच्या कसमा पट्ट्यात रमजान पर्व व उन्हाळा लक्षात घेत अनेक शेतकरी टरबूज, खरबूजाची लागवड करतात.
Watermelon crop
Watermelon cropSaam tv

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी टरबूज व खरबुजाची लागवड केली आहे. (Manmad) मात्र यंदा पाण्याची कमतरता जाणवत असून टरबूज (Watermelon) व खरबूजचे पीक धोक्यात आले आहे. परिणामी त्यांच्या उत्पादनावर देखील त्याचा परिणाम होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.  (Breaking Marathi News)

Watermelon crop
Farmer Success Story : लातूर जिल्ह्यातील द्राक्ष बाहेर देशात; शेतकऱ्याला लाख रुपयांचे उत्पादन

नाशिकच्या (Nashik) कसमा पट्ट्यात रमजान पर्व व उन्हाळा लक्षात घेत अनेक शेतकरी टरबूज, खरबूजाची लागवड करतात. मात्र बदलेले वातावरण, विहिरीतील पाण्याच्या पातळीत झालेली घट यामुळे मुबलक पाणी न मिळाल्याने टरबूज व खरबूजाचे वेल सुकून गेले आहेत. तर बदलत्या वातावरणाचा फटका खरबूजाला बसल्याने त्यावर करपा रोग व डावण्या रोगाचा प्रार्दुभाव झाल्याचे चित्र (Farmer) पाहण्यास मिळत आहे. पिकाचे वेल सुकल्याने फळ उघडी पडू लागल्याने त्यांची वाढ खुंटली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Watermelon crop
Ahmednagar News : धनगर समाजाला आरक्षण नाही, आता राजकीय पक्षांना मतदान नाही; यशवंत सेनेचा निर्णय

शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान 

पाण्याची कमतरता जाणवत असल्याने पिकांना पाणी देण्यात अडचण निर्माण होत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना ऐन हंगामात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. उत्पादनात घाट येत असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागणार आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com