Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Amalner News : कर्जफेडीच्या विवंचनेतून घेतला टोकाचा निर्णय

Jalgaon News : शेती करण्यासाठी त्यांनी कर्ज काढले होते. परंतु गतवर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातून चांगले उत्पादन आले नाही.

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : डोक्यावर असलेल्या कर्जाची फेड कशी करायची या विवंचनेतून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील वाघोदे येथे समोर आली आहे. शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन केले असता त्यांचा उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. 

अमळनेर (Amalner) तालुक्यातील वाघोदे येथील शेतकरी ईश्वरलाल चिंधा पाटील (वय ४६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ईश्वरलाल पाटील हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते. शेती करण्यासाठी त्यांनी कर्ज काढले होते. परंतु गतवर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातून चांगले उत्पादन (Farmer)आले नाही. यामुळे घेतलेले कर्ज फेडू शकले नाही. यंदा देखील चांगले उतपादन येईल कि नाही याची शाश्वती नव्हती. यामुळे कर्ज फेडीच्या विवंचनेतून ईश्वरलाल पाटील यांनी विषारी द्रव्य प्राशन केले.  

दरम्यान विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्यांना अस्वस्थ जाणवू लागले. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांना रुग्णालयातउपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र धुळे येथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT