Pune Bhatghar Dam
Pune Bhatghar DamSaam tv

Pune Bhatghar Dam : ब्रिटिशकालीन भाटघर धरण ओव्हर फ्लो; नीरा देवघर धरणाच्या सांडव्यातूनही विसर्ग Video

Pune News : पुणे जिल्ह्यात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु होता. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
Published on

पुणे : मागील पंधरा ते वीस दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाणी साठ्यात वाढ झाली आहे. धारण शंभर टक्के भरले असून भोर तालुक्यातील भाटघर धरण ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. त्याचप्रमाणे नीरा देवघर धरणाच्या सांडव्यातून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.


पुणे (Pune) जिल्ह्यात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु होता. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. प्रामुख्याने भोर तालुक्यातील धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात भाटघर हे ब्रिटिशकालीन धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे धरणाच्या स्वयंचलीत दरवाजामधून २० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रामध्ये सुरू आहे. (Rain) पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी अधिक बदल करण्यात येणार असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आणि नदी पात्रात न उतरण्याचे आवाहन पाठबंधारे विभागाने केले आहे. प्रामुख्याने धरणातून भोर, खंडाळा, बारामती, इंदापूर, फलटण या तालुक्यांना पाणी पुरवठा होतो. धरण भरल्याने या भागातील शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. 

Pune Bhatghar Dam
Chalisgaon News : कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान झाला मृत्यू

नीरा देवधर धरण ९४ टक्के भरले 

भोर तालुक्यातील नीरा देवघर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कायम असल्याने नीरा देवघर धरण ८९.८६ इतके टक्के भरले आहे. त्यामुळे विद्युतगृहद्वारे नदी पात्रामध्ये ७५० क्यूसेकने विसर्ग सुरु करण्यात आला होता. परंतु, धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू नव्हता. मागील दोन दिवसात पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणामध्ये पाण्याची आवक सुरु असल्याने आज (२ ऑगस्ट) सकाळी ८ वाजता धरण ९४ टक्के भरले आहे. यामुळे धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रामध्ये २ हजार ६५३ क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. सांडव्याच्या तीन दरवाज्यातून विसर्ग सोडण्यात आला आहे. विद्युतगृहाद्वारे ७५० क्यूसेक व सांडव्यातून २ हजार ६५३ असे एकूण ३ हजार ४०३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ केल्याने नीरा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेण्याचे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दि. ग. डुबल यांनी यांनी केले.

मुळशी धरणातून विसर्ग वाढविला 

टाटा पॉवर- मुळशी धरणातील पाणी साठ्यात देखील बऱ्यापैकी वाढ झाली आहे. टाटा पॉवर - मुळशी धरण 96 टक्के भरले आहे. यामुळे धरणातून मुळा नदी पात्रात सुरू असलेला विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या मुळशी धरणातून सुरु असलेला पाण्याचा विसर्ग ७ हजार ७५० क्युसेक्सवरून १० हजार ११ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com