Chalisgaon News : कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान झाला मृत्यू

Jalgaon News : मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतातून फारसे उत्पन्न मिळाले नाही. यामुळे हातात पुरेसा पैसे नव्हते.
Chalisgaon News
Chalisgaon NewsSaam tv
Published On

मेहुणबारे (जळगाव) : शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडीच्या विवंचनेत असलेल्या तरुण शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत विषारी द्रव्य प्रश्न केले. सदरची घटना चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे येथे घडली असून त्यांचा धुळे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. 

Chalisgaon News
Navapur News : दमदार पावसानंतर नवापूर तालुक्यातील धरण, बंधारे ओव्हरफ्लो; पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील वडगाव लांबे या गावातील मंगलसिंग पाटील (वय ४१) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे (Farmer) नाव आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतातून फारसे उत्पन्न मिळाले नाही. यामुळे हातात पुरेसा पैसे नव्हते. यामुळे यावर्षी शेती करण्यासाठी घेतलेले सोसायटी कर्ज फेडण्याइतके उत्पन्न येईल की नाही? या चिंतेत मंगलसिंग पाटील हे होते. या विचारातून त्यांनी स्वताच्या कपाशीच्या शेतात विष प्राशन केले. 

Chalisgaon News
Nashik Corporation : धोकादायक घर रिकामी करण्याच्या सूचना; नाशिक मनपाकडून ७३ मालमत्ता धारकांना नोटीस

सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना चाळीसगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र येथे उपचार घेण्याइतके पैसे नसल्याने त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा आज सकाळी मृत्यू झाला. यानंतर कुटंबाचा एकच अक्रोश झाला त्यांना दोन मुली व एक लहान मुलगा असा परिवार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com