शेतकऱ्याचा पीक विमा न देणाऱ्या इन्शुरन्स कंपनीला ग्राहक मंचाचा झटका अॅड. जयेश गावंडे ...
ऍग्रो वन

शेतकऱ्याचा पीक विमा न देणाऱ्या इन्शुरन्स कंपनीला ग्राहक मंचाचा झटका

ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळाचा शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी सामना करावा लागतो

अॅड. जयेश गावंडे

अकोला : शेतकरी म्हटले की अस्मानी संकट निश्चितच आहे. कारण कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळाचा शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी सामना करावा लागतो. म्हणूनच केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितार्थ पंतप्रधान पीक विम्याच संरक्षण शेतकऱ्यांना दिल आहे. मात्र, विमा काढून विम्याची पूर्ण रक्कम भरूनही अनेक शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित राहतात, असाच प्रकार अकोल्यातही घडला आहे.

हे देखील पहा-

अकोल्यातील शेतकरी रामकृष्ण जळमकार आणि महिला शेतकरी ज्ञानेश्वरी गावंडे यांनी 2017 च्या खरीप पिकासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये पीक विमा काढला होता. नेमकं त्याच वर्षी या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते. रामकृष्ण जळमकार यांच्या एक हेक्टर 20 आर सोयाबीन 40 आर मुंग आणि 40 आर उदित पिकांचे नुकसान झाले होते.

तर ज्ञानेश्वरी गावंडे या महिलेच्या शेतातील एक हेक्टर 99 आर सोयाबीन पिकांचे नुकसान झाले होते. परंतु, विमा कंपनीने या शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ दिला नाही. म्हणून या शेतकऱ्याला ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे न्यायासाठी धाव घ्यावी लागली आहे. ग्राहक तक्रार निवारण आयोगाने शेतकऱ्याच्या बाजूने निकाल देत, शेतकऱ्याला पीक विम्याची रक्कम आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

SCROLL FOR NEXT