मावळ - देहूतील एका प्रगतशील शेतकरी (Farmer) कुटुंबातील आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मुलाने दोन एकर शेतातील सोयाबीन (Soybean) पिकावर प्रथमच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक व तणनाशक औषध फवारणी केली आहे. सध्या तंत्रज्ञान आणि डिजिटलचे युग आहे. शेतातील पिकांवर कीटकनाशक फवारणी ड्रोनच्या द्वारे होऊ शकते हे त्याने दाखऊन दिले. यात पाण्याची आणि मजुरांची बचत झाली आहे.
हे देखील पाहा -
मावळ तालुक्यातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहूतील भूमीत हागवणे यांची दहा एकर शेती आहे.त्यात त्यांनी दोन एकर शेतात सोयाबीन च पीक घेतलं. आपल्या दोन एकर शेतातील सोयाबीन पिकावर कीटकनाशक फवारणी ड्रोनच्या माध्यमातून केली. प्रवीण हे आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.
वडील शेतकरी आहेत. मात्र वडिलांचे मजुरांसाठी होणारी ओढाताण प्रवीण यांना पाहवत नव्हती. त्यामुळे तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या प्रविनने ड्रोनचा वापर करत दोन एकर क्षेत्रातील सोयाबीन पिकावर फवारणी यशस्वी केली. त्यांनी ड्रोन मध्ये स्प्रिंकलर आणि बारा लिटरची टाकी लावली. मोबाईलवर ऑपरेट करत सात ते आठ फुट उंचीवरून ड्रोनद्वारे तणनाशक व कीटकनाशक औषध फवारणी केली. स्प्रिंकलर द्वारे सहा मीटर पर्यंत औषध फवारणी पसरत होती. केवळ अर्धा तासांत दोन एकर शेतामध्ये फवारणी करण्यात त्यांना यश आले. त्यामुळे मजुरांची आणि पाण्याची बचत झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.