Vegetables : भाज्यांचे दर कडाडले, सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री Saam Tv
ऍग्रो वन

Vegetables : भाज्यांचे दर कडाडले, सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री

महागाई ही दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महागाई Inflation ही दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल- डिझेलनंतर गॅस दरवाढ झाली. आता भाज्यांचे भाव चांगलेच कडाडले आहेत. त्यात लहरी पावसाचा शेतीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. यातच इंधन भाववाढीमुळे भाजीपाला महागला आहे.

हे देखील पहा-

यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला चांगलीच कात्री लागली आहे. लहरी पावसामुळे भाजीपालाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे, भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. त्यात इंधन भाववाढीचा परिणाम भाज्यांच्या भावावर मोठा परिणाम झाला आहे. कांदा- बटाटा आणि कोबी वगळता बहुतांश सर्व भाज्यांचे भाव तेजीत आहेत.

घाऊक बाजारांत कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी काही भाज्या फेकून दिल्या आहेत. पुरेशी लागवड न झाल्याने मागील काही दिवसांपासून भाज्यांची आवक कमी होत आहे.

भाज्यांचे भाव-

कारले -६०

गिलके- ३५

दोडके -३५

भेंडी- ६०

गवार- ६०

हिरवी मिरची- ६०

वांगे- ४०

शिमला मिरची- ४०

घेवडा -६०

बटाटा -३५

मेथी -४० रुपये जुडी.

कोथिंबीर-४० रुपये जुडी.

कांदापात -४० रुपये जुडी.

शेपू -३५ ते ४० रुपये जुडी.

पालक -३५ रुपये जुडी.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पगारातून एक रुपयाही कापला जाणार नाही, ₹२५,००० च्या निर्णायावर केंद्र सरकारचे कडक निर्देश

Maharashtra News Live Update: मानखुर्द मार्केट रोड परिसरातून २ वर्षे ४ महिन्यांचा चिमुकला बेपत्ता

८ तास महत्त्वाचे; महाराष्ट्रासह १५ राज्यात वादळी पावसाची शक्यता; ६० किमी वेगाने वाहणार वारे, IMD चा अंदाज काय?

Kalyan: लोकलमधून अचानक ट्रॅकवर पडली 24 वर्षीय तरुणी; रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

Pitru Paksh 2026 : पितृ पक्षात काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT