सोयाबीन पिकात पाणी साचून शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान विनोद जिरे
ऍग्रो वन

बीडमध्ये शेतात पाणी साचून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

बीडच्या माजलगाव तालुक्यातील मंजरथमध्ये, तीन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने, शेतात पाणी साचून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

विनोद जिरे

बीड - बीडच्या माजलगाव तालुक्यातील मंजरथमध्ये, तीन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने, शेतात पाणी साचून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मोठ्या कष्टाने आणि घामाने पिकवलेल्या शेतीचे होत असलेले नुकसान पाहून बीडमधील शेतकरी व्यथित झाले आहेत.

हे देखील पहा -

मंजरथमधील शेतकरी सिद्धेश्वर श्यामराव आळसे यांच्या शेतात पाणीचं पाणी झालं आहे. तीन दिवस उलटूनही शेतातील पाणी कमी न झाल्याने पाच एकरावरील सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सिद्देश्वर आळसे या नुकसानग्रस्त शेतकऱ्याने उसनवारी करून पाच एक्करवर सोयाबीन पिकाची पेरणी केली होती.

मात्र मागील तीन-चार दिवसांपूर्वी तालुक्यात पावसाने चांगलाचं जोर धरला होता. या पावसाच्या साठलेल्या पाण्यामुळे पाच एक्कर क्षेत्रातील सोयाबीन या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्याने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सिद्धेश्वर श्यामराव आळसे या शेतकऱ्याने केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT