डोंबिवलीतील गोरगरीब जनतेला वेळेवर शिधा द्या काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव संतोष केणे आणि डोंबिवली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांची भेट घेतली.
डोंबिवलीतील गोरगरीब जनतेला वेळेवर शिधा द्या काँग्रेसची मागणी
डोंबिवलीतील गोरगरीब जनतेला वेळेवर शिधा द्या काँग्रेसची मागणीप्रदीप भणगे
Published On

डोंबिवली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव संतोष केणे आणि डोंबिवली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि डोंबिवली शहरातील गोरगरीब लाभार्थी जनतेला शिधावाटप दुकानातून वेळेवर शिधा मिळण्याबाबत तसेच इतर समस्यांबाबत शिधावाटप अधिकाऱ्यांची चर्चा केली.

केणे यांनी सांगितले, अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत डोंबिवली शहरातील गोरगरीब लाभार्थी जनतेला माफक दरात मिळणारा शिधा (गहू, तांदूळ, साखर, डाळ) वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांच्या अनेक तक्रारी येत असून त्यांना त्यांच्या हक्काच्या धान्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गोरगरीब नागरिक त्यांच्या काही समस्या घेऊन आपल्या कार्यालयात संपर्कासाठी आले असता त्यांना आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन होत नाही. त्याकरिता आपल्या कर्मचाऱ्यांना समज देऊन नागरिकांचे समाधान व व्यवस्थित मार्गदर्शन होईल त्याची काळजी घ्यावी.

हे देखील पहा -

शिधावाटप कार्यालयात नागरिकांची कामे कार्यालयीन कर्मचाऱ्यांपेक्षा तेथील दलाल मंडळी मार्फत मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. त्यासाठी सदर दलाल मंडळी नागरिकांकडून मोठी रक्कम घेऊन त्यांना लुबाडत आहेत. असा आरोप नागरिकांनी केला असल्याचे केणे यांनी सांगितले. तसेच शासनाने शिधावाटप स्वस्त धान्य दुकानाचे परवाने ज्या दुकानदारांना दिले आहेत त्यापैकी बहुतेक दुकानदारांनी आपले परवाने इतर दुकानदारांना चालवण्यास दिले आहेत. त्यामुळे सदर दुकानदार गरीब लाभार्थ्यांचे अन्न धान्य काळ्याबाजारात चढ्या भावाने विकत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. सदर विषयाचा गांभीर्यपूर्वक विचार करून होणाऱ्या सर्व गैर प्रकाराला त्वरित आळा घालून गोर गरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस पदाधिकारी एकनाथ म्हात्रे, अजय पोळकर, वर्षाताई गुज्जर-जगताप, शरद भोईर, पमेश म्हात्रे, अभय तावरे, राहुल केणे उपस्थित होते.

डोंबिवलीतील गोरगरीब जनतेला वेळेवर शिधा द्या काँग्रेसची मागणी
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात पदवीधर महिला करतेय टॅक्टरने शेती!

डोंबिवली कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट आणि दिले निवेदन....

डोंबिवली कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची आज घेतली भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी विद्युत पुरवठा खंडीत करण्यापूर्वी वीज ग्राहकांना सूचना देण्यात येत नसून त्यांना तश्या सूचना देण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्य रस्त्यावरील मीनी फीडर आहेत ते सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावेत. ओव्हरहेड कंडक्टर अंडर ग्राउंड करण्यात यावेत.

काही ठिकाणी मीनी फीडरची झाकणे तुटली असून कुठलाही धोका निर्माण होऊ नये म्हणून ती त्वरित दुरुस्त करण्यात यावीत. काही ठिकाणी मुख्य रस्त्यांमध्ये विद्युत पॉल आहेत ते त्वरित इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावेत. डोंबिवली शहरात वारंवार अवेळी विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून तो त्वरित सुरळीत करण्यात यावा. वीज ग्राहकांना कोरोना काळात आलेल्या बिलाचे हप्ते करून त्यांना वीजबिल भरण्याची मुभा द्यावी व त्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात करू नये अश्या मागण्या यावेळी काँग्रेसतर्फे करण्यात आल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com