अवेळी पावसाने शेतकरी हतबल; 1200 हेक्टरपेक्षा अधिकच्या रब्बी पिकांचे नुकसान राजेश काटकर
ऍग्रो वन

अवेळी पावसाने शेतकरी हतबल; 1200 हेक्टरपेक्षा अधिकच्या रब्बी पिकांचे नुकसान

काल झालेल्या अवेळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर या पावसाने शेतातील संपूर्ण ज्वारीचं पिकं आडवं झालं आहे.

राजेश काटकर

परभणी : जिंतूर तालुक्यातील झरी शिवारात काल झालेल्या अवेळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर या पावसाने शेतातील संपूर्ण ज्वारीचं पिकं आडवं झालं आहे. त्यामुळे ऐन जोमात आलेली पिकांचं पावसाने नुकसान झाल्य़ाने आता जगायचा कसं? असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरी विचारत आहेत.

आधीच लॉकडाऊनमुळे (Lockdown) शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. अशातच अवेळी पडलेल्या पावसाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शिवाय काल पडलेल्या पावसामुळे तुरीच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे सद्यस्थितीला तुरीचे पीक कापून टाकल्यामुळे जमिनीवर आडवे असलेल्या पिकांना या पावसामुळे बाधा निर्माण झाली आहे.हा पाऊस जिंतूर तालुक्यातील झरी सह मिर्झापूर, साडेगाव, संबर, सावंगी, जलालपूर मांडवा डिग्रस पिंपळा नांदापूर आदी गावांना असल्यामुळे सदरील गावातील बाराशे हेक्टरच्या वरती ज्वारी, गहू, हरबरा व काढून ठेवलेल्या तुरीचे नुकसान झाले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP संस्थापक अभिजीत दीपके पुन्हा मैदानात; मुंबई पोलिसांना आंदोलनासाठी पत्र|VIDEO

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टम रिपोर्टमधून खळबळजनक माहिती समोर

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा प्रशासनाची तातडीची बोलवली बैठक

मोठी बातमी! भाजपच्या संकटमोचकाला काँग्रेसकडून ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Numerology: हा मुलांक असलेल्या लोकांना असते फुशारकी मारण्याची सवय; जेथे तेथे करतात फक्त स्वत: चं कौतुक

SCROLL FOR NEXT