गर्दी होत असेल तर बार आणि दारुची दुकाने बंद करावी लागणार- राजेश टोपे

राज्यामध्ये बार आणि देशी दारुच्या दुकानावर गर्दी होत असेल ही दुकाने देखील बंद करावी लागतील
गर्दी होत असेल तर बार आणि दारुची दुकाने बंद करावी लागणार- राजेश टोपे
गर्दी होत असेल तर बार आणि दारुची दुकाने बंद करावी लागणार- राजेश टोपेSaam Tv
Published On

जालना: राज्यामध्ये बार (bars) आणि देशी दारुच्या दुकानावर गर्दी होत असेल ही दुकाने देखील बंद करावी लागतील, असा सूचक इशारा राज्याचे (state) आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जालन्यात (Jalna) माध्यमांशी बोलताना दिला आहे. राज्यामध्ये कोरोनाच्या (Corona) रुग्णामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने नवे निर्बंध (Restrictions) लागू करण्यात आले आहेत. हे निर्बध आज रात्री पासून राज्यामध्ये लागू होणार असल्याचे ही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले आहे. राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाही.

हे देखील पहा-

तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाही असेही त्यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले आहे. शाळा, महाविद्यालय (College) बंद मात्र दारुची दुकाने सुरु असल्याने विरोधक टीका करतांना बघायला मिळत आहेत. त्यावर बोलताना टोपे यांनी दारूच्या दुकानांमुळे जर गर्दी (crowded) होत असेल तर दारुची दुकाने देखील बंद करावी लागणार आहे, असा सूचक इशारा टोपे यांनी दिला आहे. त्याचबरोबर लग्न समारंभ (Wedding ceremony) आणि धार्मिक स्थळांमध्ये देखील गर्दी होत असेल 50 पेक्षा जास्त लोक आढळून येत असेल तर त्याबाबत देखील लवकरच टप्प्याटप्याने निर्णय घेण्यात येईल, असे टोपे यांनी यावेळी म्हटले आहे.

गर्दी होत असेल तर बार आणि दारुची दुकाने बंद करावी लागणार- राजेश टोपे
Nagpur; मांजाने चिरला बँक अधिकाऱ्याचा गळा...

18 वर्षांवरील कोरोना झालेल्या मुलांना मधुमेह होण्याचा धोका वाढला असा अहवाल असला तरी ICMR ने याबाबतीत सूचना कराव्या त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुंबईतील कोविड सेंटरमध्ये पारदर्शकता नाही, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान तक्रारीनंतर पारदर्शक चौकशी करून कारवाई केली जाईल असे देखील टोपे यांनी या वेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com