hingoli saint namdev krushi utpanna bazar samiti turmeric purchase will remain open for 5 days  Saam Digital
ऍग्रो वन

Hingoli Krushi Utpanna Bazar Samiti : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हिंगाेलीत आठवड्यातून पाच दिवस हळद खरेदी सुरू करणार

शेतमाल विक्री करणे अगोदर वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च द्यावा लागत होता. त्यासोबतच बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना योग्य सोयी सुविधा नसल्याने तिथे राहणे देखील जिकरीचे बनले होते.

संदीप नागरे

Hingoli :

हिंगोली येथील संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समिती मधील हळद मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हळदीची आवक वाढली आहे. हळद विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेता बाजार समितीने आठवड्यातून पाच दिवस हळद खरेदी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra News)

हिंगोलीच्या संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी हळद विक्रीला घेऊन येत होते. मोठ्या प्रमाणात हळदीची वाहने मार्केट यार्ड्यात उभी असल्याने शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवस हळद विक्री करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती.

यामुळे शेतमाल विक्री करणे अगोदर वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च द्यावा लागत होता. त्यासोबतच बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना योग्य सोयी सुविधा नसल्याने तिथे राहणे देखील जिकरीचे बनले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता बाजार समितीने यासाठी एक नियमावली तयार केली आहे. बाजार समिती परिसर व यार्डामध्ये जी वाहने आलीत त्यांची नोंदणी करून त्या वाहनातील हळदीची खरेदी होईपर्यंत इतर वाहनांना प्रवेश नाकारला जात आहे. शनिवार आणि रविवार ही प्रक्रिया करण्यात येते व पुढचे पाच दिवस हळद खरेदी करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात आज दोन महत्त्वपूर्ण बैठका

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

Asia Cup : संजू सॅमसन, कुलदीपला डच्चू? पहिल्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT