दुचाकीचा पाठलाग करत शेतमालाचे पैसे चोरले; चोरटा CCTV मध्ये कैद  Saam TV
ऍग्रो वन

दुचाकीचा पाठलाग करत शेतमालाचे पैसे चोरले; चोरटा CCTV मध्ये कैद

साम टिव्ही ब्युरो

संदिप नागरे

हिंगोली : मराठवाड्यात मागील काही महिन्यांपासून बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या वयोवृद्धांवर पाळत ठेवून त्यांना लुटण्याच्या अनेक घटना पुढे आल्या आहेत, यातील अनेक गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या मात्र तरी देखील असे प्रकार वारंवार घडतच आहेत. अश्यातच आता हिंगोलीच्या वसमत शहरात एका वयोवृद्ध शेतकऱ्यांसोबत घडलेल्या भयंकर प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात चोरट्यांची दहशत पसरली आहे. वयोवृध्द शेतकरी माणिकराव नवघरे राहणार वसमत तालुक्यातील बाभुळगाव. दुष्काळ अतिवृष्टी या नैसर्गिक संकटाचा सामना करून, यांनी त्यांच्या शेतात काबाडकष्ट करून सोयाबीन पिकाचे उत्पादन घेतले. उत्पादन झालेले हेच सोयाबीन नवघरे यांनी वसमत येथील बाजारपेठेत आडत दुकानदाराकडे आठ दिवसांपूर्वी विक्री केले, त्याची रक्कम काल सकाळी आडत दुकानदाराने नवघरे यांच्या खात्यात जमा केली. बँकेत जमा झालेले हेच पैसे काढून, खते व बियाण्यांची उधारी रक्कम देण्यासाठी आज सकाळी माणिकराव नवघरे हे वसमत शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेत आले होते.

नवघरे यांनी नेहमी प्रमाणे बँकेची स्लिप भरून एक लाख रुपयाची रक्कम काढत, आपल्या दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवत नवघरे हे बाजारपेठेतील त्यांच्या भावाच्या दुकानाकडे निघाले, मात्र बँकेच्या पुढे वयोवृद्धांच्या पैशावर डोळा ठेवत दबा धरून बसलेल्या एका चोरट्याने नवघरे यांच्या दुचाकीचा पाठलाग करायला सुरुवात केली. याच वेळी वसमत पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरील चौकात नवघरे यांच्या दुचाकीचा वेग कमी होताच चोरी करण्याची योग्य संधी साधत या चोरट्याने या वयोवृद्ध शेतकऱ्याच्या पैशावर हात साफ करत, तेथून पळ काढला. धक्कादायक म्हणजे हा चोरटा ही पैशाची रक्कम काढत असताना अनेक नागरिक रस्त्याने जात होते. मात्र चोरट्याच्या हातचलाखीचा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही तसेच चालत्या गाडीच्या डिकीतून आपल्या रकमेवर कोणीतरी हात साफ केला याची जरा ही कल्पना नवघरे यांना ही आली नाही. मात्र काही वेळाने त्यांच्या हा भयंकर प्रकार लक्षात आला व ते जागेवरच स्तब्ध झाले, त्या नंतर त्यांनी आरडाओरड करत नागरिकांना बोलावून दुचाकीच्या डिकीतून ठेवलेली रक्कम गायब झाल्याचे सांगत वसमत पोलीस स्थानक गाठून रक्कम पळविणाऱ्या चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

धक्कादायक म्हणजे वसमत शहर पोलिसांनी शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात माणिकराव नवघरे यांना लुटणारा चोरटा कैद झाला असून, त्याचा प्रताप पाहून पोलिसही चक्रावले आहेत. दुचाकी सुरू असताना या चोरट्याने या वृद्धाचा पाठलाग करत गाडी हळू चालताच पांढऱ्या रंगाच्या रुमालात गुंडाळून ठेवलेली एक लाख रुपयांची रक्कम पळविल्याचे या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये स्पष्ट दिसत आहे, त्यामुळे पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत या चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. वसमत शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक या चोरट्याच्या शोधावर आहे. विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्यात मागील सहा महिन्यात अनेक वयोवृद्धांना बँकेच्या पुढे चोरट्यांनी पाळत ठेवून लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव जवळा बाजार व वसमत शहरातील घटनांचा समावेश आहे. या घटनांमुळे हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी या चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अहेरी विधानसभेत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

Sara Ali Khan Networth: 'पतौडी' घराण्यात जन्मली सारा; संपत्तीचा आकडा वाचून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT