Hingoli News Saam tv
ऍग्रो वन

Hingoli News : हिंगोलीत कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

Hingoli News : हिंगोलीत कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगावमधील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. (Hingoli) राजकुमार चव्हाण असे या शेतकऱ्याचे (Farmer) नाव असून शेतात आलेली नापिकी व डोक्यावर उभा असलेला कर्जाचा डोंगर या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्रात मागासलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या हिंगोलीमध्ये सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी दररोज टोकाचे पाऊल उचलून मृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. पाच तालुक्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यात मागील दहा महिन्यात तब्बल ३५ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून जगाचा निरोप घेतला आहे. 

दरम्यान काल सायंकाळी देखील वसमत तालुक्यातील आडगाव (रंजेबुवा) गावातील ५५ वर्षीय शेतकरी राजकुमार चव्हाण यांनी शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी टाहो फोडत बळीराजाच्या वाढत्या आत्महत्या रोखण्याची सरकारकडे मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

RBI Recruitment: इंजिनियर झालात? रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Solapur Temple Tourism: अक्कलकोट ते पंढरपूर, सोलापूरमधील या TOP 8 स्थळांना उन्हाळ्यात नक्कीच भेट द्या, मन होईल प्रसन्न

Ayan Ahmed Case: १८० मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयानचा नवा VIDEO समोर, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात दररोज केस धुवावे की नाही? घाम आणि कोंडा होऊ नये म्हणून काय करावे?

SCROLL FOR NEXT