Hingoli News Saam tv
ऍग्रो वन

Hingoli News : सीसीआयकडून कापूस खरेदी बंद; शेतकऱ्यांच्या गाड्या खरेदी केंद्रावर थांबल्या

Hingoli : यंदाच्या हंगामात कापसाला सहा ते सात हजार प्रति क्विंटल इतका भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कापसाचे दर वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे

संदीप नागरे

हिंगोली : कापसाला भाव नसल्याचे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या दरम्यान राज्यभरात केंद्र शासनाच्या सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले होते. मात्र या केंद्राकडून गेल्या तीन दिवसापासून शेतकऱ्यांची कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. परिणामी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून केंद्राच्या बाहेर गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. 

यंदाच्या हंगामात कापसाला सहा ते सात हजार प्रति क्विंटल इतका भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कापसाचे दर वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे. मात्र अजूनपर्यंत कापसाच्या दरात कोणत्याही प्रकारे भाव वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत नाही. यामुळे बहुतांश शेतकरी मिळेल त्या दरात कापूस विक्री करत आहे. तर केंद्र शासनाने देखील सीसीआय खरेदी केंद्र सुरु केले होते. 

कापूस विक्रीविना गाड्या उभ्या 

दरम्यान सीसीआय खरेदी केंद्रावर कापूस खरेदी बंद करण्यात आल्याने हिंगोलीमध्ये कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा मनस्ताप झाला आहे. हिंगोलीच्या शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या गाड्या कापूस विक्री विना थांबल्या असून केंद्राच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. केंद्रावरील सदरची खरेदी कधी सुरु होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. 

तांत्रिक अडचणीचे कारण 

दरम्यान मागील तीन दिवसांपासून सीसीआयच्या खरेदी केंद्रावर खरेदी थांबली आहे. परंतु शासनाने कापूस खरेदी बंद केली नसून सर्वरमध्ये तांत्रिक अडचण आल्याने कापूस खरेदीची प्रक्रिया थांबली असल्याचे स्पष्टीकरण हिंगोलीच्या कापूस खरेदी करणाऱ्या सीसीआय खरेदी केंद्राकडून देण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना देखील खरेदी सुरु होण्याची प्रतीक्षा कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharastra Politics: राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार; दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश

MSRTC: रील्स, लाईव्ह स्ट्रीमिंग...; गणवेशात व्हिडिओ बनवण्यास बंदी, ST कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम लागू

विलास घुले मृत्यू प्रकरण तापलं! खासदाराच्या मुलाला अटक करा नाहीतर...; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण

'गुंगी गुडिया'ला धनंजय मुंडेच जबाबदार? सुनील तटकरेंनी मुंडेंचे कान टोचले

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

SCROLL FOR NEXT