Sangli DCC Bank : साडेपाच हजार मृत कर्जदाराच्या वारसांना नोटीसा; सांगली जिल्हा बँकेकडून आतापर्यंत ७० लाख वसुली

Sangli News : ३१ मार्च अवघ्या दीड महिन्यावर आला आहे. कोणत्याही परिस्थितीत एनपीए कमी करण्यासह अडीचशे कोटी रुपये नफ्यासाठी आत्तापासून थकबाकी वसुलीसाठी सांगली जिल्हा बँकेच्या जोरदार हालचाली सुरू आहेत
Sangli DCC Bank
Sangli DCC BankSaam tv
Published On

सांगली : सांगली जिल्हा बँकेकडून कर्ज घेऊन मृत झालेल्या ५ हजार ४९७ शेतकऱ्यांच्या वारसांना वसुलीच्या नोटिसा देण्यात सुरुवात करण्यात आली आहे. त्यांच्याकडे तब्बल ५२ कोटी रुपये थकित आहेत. थकीत ५९ हजार शेतकऱ्यांपैकी ४० हजार शेतकऱ्याना नोटीसा बजावल्या आहेत. बँक प्रशासन मृतांचे वारसांचे पत्ते शोधून नोटीसा बजावत आहे. तर आतापर्यंत ३२५ मृत शेतकऱ्याच्या वारसांना नोटिसा दिले असून ७० लाख रुपये वसुलीही झाली आहे.

आर्थिक वर्ष समाप्तीवर आले आहे. अर्थात ३१ मार्च अवघ्या दीड महिन्यावर आला आहे. कोणत्याही परिस्थितीत एनपीए कमी करण्यासह अडीचशे कोटी रुपये नफ्यासाठी आत्तापासून थकबाकी वसुलीसाठी सांगली जिल्हा बँकेच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून बड्या नेत्यांच्या संबंधित पाच सूत गिरण्यासाठी लिलाव नोटीस काढले आहेत. त्याचबरोबर मृत शेतकऱ्यांसह थकबाकीदार शेतकऱ्यांनाही नोटीस बजावल्या जात आहेत. 

Sangli DCC Bank
Crime News: 'माहेरी जाऊ नकोस', रागाच्या भरात पोलिसाच्या पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

वारसांचा शोध घेऊन नोटीस 

जिल्हा बँक विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून कर्ज वाटप करते. यामध्ये ५ हजार ४९७ कर्जदार मृत आहेत. त्यांच्याकडील ५२ कोटी रुपये थकीत वसुलीसाठी फारसे कोणी प्रयत्न करीत नव्हते. मात्र गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्या वारसांना नोटीसा देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी केली जात आहे. त्यांचे मृतांची वारसा शोधून नोटीस दिल्या जात आहेत. 

Sangli DCC Bank
HSC Exam : कॉपी करू न दिल्याने शिक्षकाला अडवून धमकावले; शिक्षक संघटनेकडून पेपरवर बहिष्काराचा इशारा

सातबारावर नावे लावून नोटीस 

वसुलीच्या अनुषंगाने बँक कर्मचारी प्रसंगी तलाठी व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला जात आहे. राहत्या घरावर वारसांची नावे लावली असतील तर जमिनीच्या सातबारावर नावे लावून त्यांना नोटीसा दिल्या जात आहेत. बँकेकडून आतापर्यंत ३२५ मृत शेतकऱ्यांच्या वारसांना नोटीस बजावत ७० लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तर मार्च अखेर वसुलीसाठी सुट्टीच्या दिवशी कामकाज सुरू ठेवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com