अतिवृष्टीचा फटका; शेतकऱयाने तोडून टाकली केळीची बाग! संतोष जोशी
ऍग्रो वन

Nanded : अतिवृष्टीचा फटका; शेतकऱयाने तोडून टाकली केळीची बाग!

यंदा अतिवृष्टी आणि करपा रोगामुळे नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अर्धापूर तालुक्यातील देळूब येथील एका केळी उत्पादक शेतकऱ्याने बागेतील दिड हजार केळीची रोपटी अक्षरशः तोडून टाकली.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : यंदा अतिवृष्टी आणि करपा रोगामुळे नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अर्धापूर तालुक्यातील देळूब येथील एका केळी उत्पादक शेतकऱ्याने बागेतील दिड हजार केळीची रोपटी अक्षरशः तोडून टाकली. शैलेश लोमटे असे या आर्थिक संकटात सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे.

हे देखील पहा :

लोमटे यांनी केळी लागवडीवर एक लाख रुपये खर्च केला आणि त्यांना तीन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होतं मात्र करपा आणि अतिवृष्टीनं संपूर्ण केळी खराब होत असल्याने केळीची संपुर्ण रोपटी तोडून टाकली आहेत. जिल्हयातील अर्धापूर, मूदखेड, हदगाव, भोकर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते.

अतिवृष्टीमुळे केळीचे मोठे नुकसान होत असतानाच करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. केळी परिपक्व होण्याअगोदरच पिवळी पडत असल्याने शेतकरी हवालदील झालाय. लोमटे यांच्या प्रमाणे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या कष्टाने पिकवलेली केळीची बाग उद्धवस्त कारण्याशिवाय पर्याय उरला नाही. केळी उत्पादक शेतकरी शासनाकडे मदतीची मागणी करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आम्ही राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या पाठिशी; क्राइम ब्रांचच्या कारवाईनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Vijay Hazare Trophy: सेमीफायनमध्ये या ४ टीम्सने मारली दणक्यात एन्ट्री; पाहा कुठे आणि कधी रंगणार सामने

Maharashtra Live News Update : नरेश अरोरा यांच्या कारवाईवर सुनिल तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला करा विशेष उपाय; संकटं, अडथळे, पैशांची तंगी, अडचणी होतील दूर

Homemade Facepack: नॅचरल ग्लोसाठी आठवड्यातून २ वेळा हा खास होममेड फेसपॅक नक्की लावा

SCROLL FOR NEXT