काढणीला आलेले मूग, उडीदासह खरीप पिके धोक्यात विनोद जिरे
ऍग्रो वन

काढणीला आलेले मूग, उडीदासह खरीप पिके धोक्यात

जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकरी संकटात...

विनोद जिरे

बीड - जिल्ह्यातील अनेक भागात संततधार पावसाने Rain काढणीला आलेले मूग, उडीद व खरीप पिके Crop धोक्यात आली आहेत. ऐन काढणीच्या वेळी पाच ते सहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मूग आणि उडीद पिकाच्या शेंगा कुजून गळू लागल्या आहेत. तसेच काही ठिकाणी भिजल्यामुळे शेंगा उगवूंन येऊ लागल्या आहेत. सततच्या पावसाने पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी शेंगांना कीड लागत असून पावसाच्या पाण्याने शेंगा सडत असल्याचे चित्र निर्माण झालं आहे.

हे देखील पहा -

तर दुसरीकडे कापसावरही मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पिके जोमाने आली. मात्र, ऐन फळधारणेच्या वेळेत, पावसाने ओढ दिल्याने, उडीदाचे उत्पन्न घटले. त्यात आता काढणीला सुरुवात करायची तोच, संततधार पावसाने मूग, उडीद या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT