Unseasonal Rain
Unseasonal Rain Saam tv
ऍग्रो वन

Unseasonal Rain : सलग चौथ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस; गोंदियात फळ भाज्यांसह धान पिकाचे नुकसान

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

गोंदिया : मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस होत आहे. दरम्यान गोंदिया जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली. यामुळे (Gondia) शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष करून फळ, भाज्यांसह धान पिकांचे नुकसान झाले आहे. (Latest Marathi News)

राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार तीन- चार दिवसांपासून विविध भागात अवकाळीने हजेरी लावली आहे. त्यानुसार हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार गोंदियात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सलग तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी (Farmer) अक्षरशः हवालदिल झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळे देखील नुकसान झाले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फळभाजी, पिकांचे नुकसान 

गोंदिया जिल्ह्यात होत असलेल्या वादळी वारा तसेच अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. जोरदार वर असल्यामुळे आंब्याचा बहर गाळून पडत आहे. तर पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकासह फळभाजी आणि धान पिकाला याचा मोठा फटका बसला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News | पुण्यातील चाकण परिसरात गॅस टँकरचा स्फोट

Gold Silver Rate Hike : सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; वाचा महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील आजचा भाव

Nashik Loksabha: मतदानाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस अलर्ट; तब्बल ३ हजार ५१८ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

Sangali News: सांगली, पुण्यासह ५ रेल्वेस्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी; संशयित आरोपीला मुंबईतून अटक

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला, घरांची पडझड VIDEO

SCROLL FOR NEXT