Solapur Latest News, Solapur news today विश्वभुषण लिमये
ऍग्रो वन

सोलापुरातील मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्याची फसवणूक

तोतया कांदा व्यापाऱ्याने शेतकऱ्याला फसवले; अनेक तोतया मार्केट यार्डमध्ये फिरतात मोकाट

विश्वभुषण लिमये

सोलापूर: कांद्यासाठी महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर गाजलेली सोलापुरातील (Solapur) बाजार समिती आता मात्र तोतया आणि फसव्या व्यापाऱ्यांसाठी (traders) देखील गाजणार की काय अशी शंका येऊ लागली आहे. बार्शीतील शेतकरी (farmers) बिरुदेव क्षीरसागर या शेतकऱ्याच्या भोळेपणाचा फायदा घेऊन इमाम गफूर नामक लायसनन्स रद्द झालेल्या व्यापाऱ्याने चांगल्या भावाने कांदा विकतो म्हणून क्षिरसागर यांचा कांदा उतरवून घेतला. 40 हजार रुपये कांद्याची पट्टी झाली. (Solapur Latest News Updates)

हे देखील पहा-

त्यामध्ये 10 हजार रुपये शेतकऱ्याला दिले आणि 30 हजार रुपयांचा बनावट चेक देऊन हा तोतया व्यापारी मार्केट यार्डमधून (Market Yard) फरार झाला आहे. ज्या ठिकाणी या शेतकऱ्याचा कांदा (Onion) उतरवून घेण्यात आला होता. त्या दुकानावर बाजार समिती प्रशासनाने कारवाई केली आहे.मात्र, 4 महिने 40 हजार रुपयांसाठी काबाड कष्ट केलेल्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. कारवाईच्या नावाखाली प्रशासकीय सोपस्कार बाजार समितीने पार पाडले.

मात्र, असे कितीतरी तोतया व्यापारी हे भोळ्या आणि गरीब शेतकऱ्यांना फसवण्यासाठी बाजार समितीमध्ये मोकाट फिरतायत त्याचा बंदोबस्त करण्यात सोलापूरची बाजार समिती अपयशी ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीच्या भरवश्यावर न राहता स्वतःच योग्य व्यापारी शोधून आपला माल विकावा लागणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : पुण्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात; बंदुकीचा धाक दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न

Viral Video: ट्रेनमधून पळ काढण्याचा प्रयत्न अन् पतीने पत्नीला प्रियकरासह पकडले, व्हिडीओ व्हायरल

अवघ्या ५ वर्षांचा प्रवास थांबणार! 'Aai Kuthe Kay Karte' घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्याने केली भावुक पोस्ट

Maharashtra News Live Updates : धार्मिक विधींसाठी साईसमाधी मंदिरात भाविकांना दोन तास दर्शन राहणार बंद

Mumbai News : मुंबईतून 9 कोटींचे डॉलर्स जप्त, निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT