Breaking: फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ

मुंबई पोलिसांनी सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत ६ जणांचे साक्षीदार म्हणून जबाब नोंदवले
Rashmi Shukla Phone Tapping case News Updates
Rashmi Shukla Phone Tapping case News Updates Saam Tv
Published On

मुंबई: फोन टॅपिंग प्रकरणात अगोदरपासूनच अडचणीत सापडलेल्या रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. चौकशीत फोन टॅपिंग करताना बोगस नावे वापरल्याची माहिती समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. फोन टॅपिंग करताना संजय राऊतांऐवजी (Sanjay Raut) एस. रहाटे आणि एकनाथ खडसेंऐवजी (Eknath Khadse) खडासने असा उल्लेख करण्यात आला होता. महत्त्वाची बाब म्हणजे, बोगस नावे वापरताना या लोकांच्या नावांशी मिळत्या जुळत्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता.

हे देखील पहा-

मुंबई (Mumbai) पोलिसांनी सीआरपीसी (CRPC) कलम १६४ अंतर्गत ६ जणांचे जबाब नोंदवले आहेत. या ६ जणांमध्ये त्यावेळच्या ACS होम आणि DYSP दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश यामध्ये आहे. या दोघांपैकी जे DYSP आहेत. जे त्यावेळी SID मध्ये कर्तव्यावर होते आणि त्यांना या फोन टॅपिंग प्रकरणाची माहिती होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन टॅपिंग करताना संजय राऊत आणि एकनाथ खडसेंच्या नावांऐवजी बोगस नावांचा वापर करण्यात आला होता. संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन समाजविघातक घटक या नावाखाली टॅप होत होते, अशी माहिती पोलीस (Police) सूत्रांनी दिली होती.

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तपासात एक पत्र समोर आले. गृहविभागाच्या सचिवांना फोन टॅपिंगच्या परवानगीसाठी लिहीलेल्या या पत्रामध्ये संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन नंबर मिळले होते. मात्र, त्यांच्या नावापुढे नावे न देता समाजविघातक घटक असे नमूद करण्यात आले होते, अशी माहिती समोर आली होती. या अगोदर फोन टॅपिंग प्रकरणात आणखी खुलासा सुत्रांमार्फत करण्यात आला होता. संजय राऊत यांचा ६० दिवस तर एकनाथ खडसे यांचा ६७ दिवस फोन टॅप होत असल्याचे समोर आले होते.

Rashmi Shukla Phone Tapping case News Updates
नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही; ईडीच्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा तातडीच्या आधारावर संजय राऊत यांचा ७ दिवस फोन टॅप करण्यात आला आणि दुसऱ्यांदा एसीएस होमच्या परवानगीने ६० दिवस फोन टॅप करण्यात आला. मुंबई पोलिसांनी तत्कालीन एसीएस होम एस कुमार यांचा जबाब देखील नोंदवला आहे. एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचे नाव एसआयडीच्या स्वरुपात फोन टॅपिंगच्या विनंतीमध्ये असल्याचे कुमार यांनी आपल्या जबाबामध्ये सांगितले होते. खरे तर एकनाथ खडसे किंवा संजय राऊत यांचा फोन टॅप होत असल्याचे कोणाला देखील कळू नये, म्हणून एसआयडीकडून चुकीच्या नावाने विनंती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले होते. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १० पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदवले आहेत. दरम्यान या प्रकरणी मुंबई पोलिसांनी २ वेळा आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे. एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचे देखील जबाब व्हिक्टिम कॅपॅसिटीमध्ये पोलिसांनी नोंदवले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com