Pandharpur News भारत नागणे
ऍग्रो वन

खत निर्मिती करणाऱ्या ग्रीनटेक अ‍ॅग्रो प्राॅडक्टस कंपनीचा परवाना निलंबित...

कृषी विभागाच्या कारवाईमुळे बनावट खत निर्मिती करणाऱ्या या कंपनीला चांगलाच दणका बसला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंढरपूर - बोगस खते तयार करून ती शेतकऱ्यांच्या माथी मारणाऱ्या पुणे (Pune) जिल्ह्यातील भोर येथील ग्रीनटेक अ‍ॅग्रो प्राॅडक्टस या कंपनीचा परवाना कृषी विभागाने निलंबित (Suspended) केला आहे. कृषी विभागाच्या कारवाईमुळे बनावट खत निर्मिती करणाऱ्या या कंपनीला चांगलाच दणका बसला आहे. बोगस खतांमुळे दाक्ष बागेचे नुकसान झाल्याचा धक्कादायक प्रकार साम टीव्हीने समोर आणला होता.

हे देखील पहा -

साम टीव्हीच्या बातमीची दखल घेऊन कृषी आयुक्त कार्यालयाचे संचालक दिलीप झेंडे यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या कंपनीचा खत निर्मितीचा परवाना अनिश्चित काळासाठी निलंबित केला आहे. माढा तालुक्यातील बावी‌ येथील विजय मोरे व इतर काही शेतकऱ्यांनी ग्रीनटेक अ‍ॅग्रो प्राॅडक्टस कंपनीची खते खरेरी करून दाक्ष बागेसाठी वापरली होती.

दरम्यान या खतांमुळे या शेतकऱ्यांचे दाक्ष घड जळून‌ गेले होते. यामध्ये या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ही बातमी साम टीव्हीने लावून धरल्याने कृषी विभागाने संबंधीत कंपनीच्या खतांच्या नमुने तपासले असता ते बोगस असल्याचे सिध्द झाल्यानंतर ही कारवाई केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT