महिला कृषी सहाय्यकाने ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांना दाखवली पेरणीची प्रात्यक्षिके  दिनू गावित
ऍग्रो वन

महिला कृषी सहाय्यकाने ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांना दाखवली पेरणीची प्रात्यक्षिके

सदर बीबीएफ यंत्राद्वारे रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी करताना एकाच वेळी खतही दिले जाते या पद्धतीचा अवलंब केल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो.

नंदुरबार दिनू गावित

नंदुरबार - जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मौजे कळंबू येथील शेतकरी Farmer नामदेव चौधरी व प्रकाश चौधरी यांच्या शेतात शहादा तालुका कृषी कार्यालयाच्या मार्फत सोयाबीन पिकाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रात्यक्षिकात सोयाबीन Soyabean पिकाची बीजप्रक्रिया करून बीबीएफ यंत्राद्वारे कसे पेरावे? याबाबत मोजे कळंबू येथील महिला कृषी सहाय्यक शितल सोनवणे Shital Sonawane यांनी स्वतः ट्रॅक्टर Tractor चालवून यंत्राच्या साह्याने सोयाबीन बियाण्यांची पेरणी करून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके दाखवली.

सदर बीबीएफ यंत्राद्वारे रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी करताना एकाच वेळी खतही दिले जाते या पद्धतीचा अवलंब केल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो. त्यामुळे हेक्टरी २५ ते ३० टक्के उत्पादनात वाढ होते.

हे देखील पहा -

शेतकरी नामदेव चौधरी यांच्या शेतात बीबीएफ यंत्र व्यतिरिक्त हेक्‍टरी ३० किलो बियाणे लागायची परंतु कृषी विभागाच्या मदतीने बीबीएफ यंत्राद्वारे केलेल्या पेरणीत २३ किलो बियाणे लागले असून सात किलो बियाण्याची बचत झाली आहे. त्याचबरोबर पेरणी देखील योग्य अंतराने झाली आहे.

कृषी विभागाच्या मदतीने बीबीएफ यंत्राद्वारे सोयाबीन व्यतिरिक्त तूर, मूग, उडीद, मका, या पिकांची देखील पेरणी करता येते. बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी केलेल्या पिकांमध्ये ओलावा टिकून राहतो, तसेच अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बीबीएफ यंत्राद्वारे रुंद वरंबा सरी पद्धतीने जास्तीत जास्त पेरण्या कराव्या असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Diljit Dosanjh: आधी देशात दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचे सरकारला ओपन चैलेंज,काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

SCROLL FOR NEXT