sharad pawar and dada bhuse
sharad pawar and dada bhuse saam tv
ऍग्रो वन

नकली सेंद्रिय उत्पादनांवर FDA ची राहणार करडी नजर : डॉ. राजेंद्र शिंगणे

साम न्यूज नेटवर्क

मुंबई : सेंद्रिय उत्पादनांना (Organic Products) प्रोत्साहन देताना ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग (food and drugs department) शंभर टक्के सहकार्य करेल अशी हमी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (dr rajendra shingane) यांनी दिली. सेंद्रिय आणि विषमुक्त शेती (Organic Farming) या विषयावर अन्न व औषध प्रशासन विभागाशी (FDA) चर्चा करण्यासाठी नुकतीच सह्याद्री अतिथी गृह येथे माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार (sharad pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत चर्चेअंती डॉ. शिंगणे यांनी नागरिकांना उत्तम प्रतिची सेंद्रिय उत्पादने मिळावीत यासाठी एफडीए योग्य त्या उपाययोजना करेल अशी ग्वाही दिली.

डॉ. शिंगणे म्हणाले बाजारात अनेक अन्न पदार्थ हे सेंद्रिय पदार्थ म्हणुन विकले जाताहेत. ज्या पदार्थांच्यावर सेंद्रिय अन्नपदार्थ असे लिहिले असते त्या पाकीटात तेच पदार्थ आहेत का हे खात्रीपुर्व सांगता येत नाही. त्यामुळे या गाेष्टीवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांनी अन्न सुरक्षा व मानके नियमन तयार केले आहे.

यामध्ये जे अन्न पदार्थ सेंद्रिय अन्नपदार्थ म्हणून बंदीस्त पाकीटातून विक्री केली जातात. त्या प्रत्येक पदार्थाला (NATIONAL PROGRAMME FOR ORGANIC PRODUCTION) या यंत्रणेचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. उत्पादनांवर 'जैविक भारत' चा लोगो स्पष्टपणे छापलेला असावा असा नियम आहे. या नियमांची एफडीएच्या माध्यमातून अंमलबजावणी केली जाईल. याबराेबरच विशेष मोहिमांच्या माध्यमातून नकली सेंद्रीय उत्पादकांवर कारवाई केली जाईल असेही डाॅ. शिंगणे यांनी स्पष्ट केले.

सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक : कृषीमंत्री दादा भुसे

सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक असून देशात सेंद्रिय उत्पादनात राज्याचा दुसरा क्रमांक आहे अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी बैठकीत दिली. भुसे म्हणाले परंपरगत शेती बराेबरच कृषी विभागातर्फे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रमाणिकरणासाठी अनेक विभागाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. यासाठी सेंद्रिय शेती साठीचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्यात येईल.

मंत्री भुसे म्हणाले अन्न प्रकिया व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. शेतमालाला चांगला भाव मिळावा त्याच बरोबर इतर अपारंपारिक भाजीपाल्याची ग्राहकांना ओळख व्हावी यासाठी विविध ठिकाणी झालेल्या रानभाज्या महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

पणन विभाग सेंद्रिय उत्पादनांबाबत प्रबोधन करेल : पणनमंत्री बाळासाहेब पाटील

या बैठकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सेंद्रिय उत्पादनाला योग्य ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी सहकार व पणन विभाग गृहनिर्माण संस्थांमधुन जनजागृती करेल असे नमूद केले. पणन विभागाने सुरु केलेल्या ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्मस वर या उत्पादनांना विक्रीसाठी ठेवता येईल. त्याच बरोबर विक्री मेळावे, प्रदर्शन आणि इतर उपक्रमातुन सेंद्रिय उत्पादनांबाबत प्रबोधन करता येईल असेही श्री. पाटील यांनी नमूद केले.

पशुंच्या उत्तम वाढीसाठी सेंद्रिय चारा उपयुक्त : पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

राज्यातील शेतक-यांना दुधाचे उत्तम उत्पादन मिळावे यासाठी पशुंना सेंद्रिय चारा दिल्यास उपयुक्त ठरेल यासाठीचा प्रस्ताव विभागामार्फत तयार केला जाईल अशी ग्वाही पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्री सुनील केदार यांनी बैठकीत दिली. यासाठी मोर्फाच्या सदस्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊ. कोरोना (corona) नंतर प्रथिनयुक्त आहारांचे महत्व लोकांना पटल्याने दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे असे ही मंत्री केदार यांनी नमूद केले.

या बैठकीस सहकार व पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पदुमचे प्रधान सचिव जे.पी गुप्ता, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव विजय सौरभ,आयुक्त डॉ. परिमल सिंग यांच्यासह FSSAI चे संचालक प्रिती चौधरी, मोर्फाचे अध्यक्ष अंकुश पडवळे, उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे, सचिव प्रल्हाद वरे आदी उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT