Latur News Saam Tv
ऍग्रो वन

Latur: खरीप पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार मोठी रक्कम, प्रीमियम बँकांमध्ये जमा

लातूर जिल्ह्यात ६ लाख हेक्टर क्षेत्र खरिपाचे आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर - केंद्र सरकार (Central Government) पुरस्कृत प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख १ हजार ३९९ हेक्टरवरील सोयाबीन या प्रमुख पिकासह अन्य खरीप पिकांचा विमा तब्बल ७ लाख ३७ हजार ८१६ शेतकऱ्यांनी उतरविला आहे.

या पीकविम्यापोटी ५२ कोटी १३ लाख ४४ हजार ५२५ रुपयांचा प्रीमियम विविध बँकांमध्ये जमा झाला असल्याची माहिती भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक संतोष भोसले यांनी दिली.

हे देखील पाहा -

लातूर जिल्ह्यात ६ लाख हेक्टर क्षेत्र खरिपाचे आहे. यातील ४ लाखांवर हेक्टरवर सोयाबीन पिकाचा पेरा होतो. खरिपात अल्पपर्जन्यमान, अतिवृष्टी, असमाधानकारक पाऊस यासह विविध कीडरोगांमुळे पिकांचे नुकसान होत असते. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो.

त्यामुळे केंद्र सरकारने खरीप पिकांना विमा संरक्षण मिळावे म्हणून खाजगी विमा कंपनीमार्फत पीकविमा भरुन घेतला जातो. यंदा १ ऑगस्टपर्यंत पीकविम्याचे हप्ते शेतकऱ्यांकडून ऑनलाईन व बँकांमार्फत भरुन घेण्यात आले. तब्बल ५ लाख १ हजार ३९९ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविण्यात आला असून, त्यासाठी ५२ कोटी १३ लाख ४४ हजार ५२५ रुपये भरणा करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रवींद्र धंगेकर घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Technology News: मानवी मन वाचता येणार; मेंदू कॉम्प्युटरशी कनेक्ट होणार

Amazon Layoff : कामावर येऊ नका, सकाळी ई-मेल धडकला; अ‍ॅमेझॉनमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी नोकरकपात

Janjira Fort : जंजिरा किल्ला पर्यटनासाठी बंद, प्रशासनाने का घेतला निर्णय?

Zodiac Signs Tuesday: मंगळवारच्या कार्तिक सप्तमीला चार राशींसाठी शुभ संकेत; नवी सुरुवात होणार यशस्वी

SCROLL FOR NEXT