nashik news, onion price drop, farmers, rasta roko andolan
nashik news, onion price drop, farmers, rasta roko andolan saam tv
ऍग्रो वन

Nashik Rasta Roko Andolan News : सरकारचं डाेकं ठिकाणावर आणणार ! कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राेखली केळझर फाट्यावरील वाहतुक

Siddharth Latkar

- अजय साेनवणे

Nashik News : कांद्याचा दर दिवसेंदिवस घसरु लागल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी (farmer) संतापले आहेत. काही दिवसांपुर्वी विंचूर प्रकाशा राज्य मार्गावरील रस्त्यावर उतरत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. आज (शुक्रवार) जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील केळझर फाट्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलनास (rasta roko andolan) प्रारंभ केला. (Maharashtra News)

नाशिक जिल्ह्यातील गेल्या महिन्यात बागलाण तालुक्यात अवकाळी आणि गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासनाच्या वतीने करण्यात आले. मात्र कोणत्याही प्रकारची मदत अद्याप शेतक-यांना मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले.

आज शेकडाे शेतकरी केळझर फाट्यावर जमा झाले. त्यानंतर सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरु केला. यावेळी शेतक-यांनी रस्त्यावर कांदे ओतून दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यात दाैरा केला हाेता.

त्यावेळी अवकाळी ग्रस्त शेतकरी वर्गास मदत जाहीर केली. परंतु अद्याप अनुदानापासून वंचित ठेवले आहे. तसेच गारपीट ग्रस्त शेतक-यांना देखील मदत दिली पाहिजे अशी मागणी करत शेतक-यांनी सरकारच्या विरोधात घाेषणाबाजी केली. यावेळी केळझर फाटा परिसरात पाेलिसांचा बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता.

Edited By : Siddharth atkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avinash Jadhav: मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा; सराफा व्यापाऱ्याकडे ५ कोटी मागितल्याचा आरोप

Health Tips: सकाळी प्या हिंगाचे पाणी, वजन राहील नियंत्रणात

Maharashatra Election: ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा किल्ला राखणं शिंदेंना जड?

West Bengal News: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप; कर्नाटकचे खासदार प्रज्ज्वल रेवन्नाविरोधात लुकआउट नोटीस जारी

Jayant Patil: ... तर पंचाईत होईल, जयंत पाटील यांचा विश्वजित कदम यांना इशारा; नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT