मावळात रिंगरोडला शेतकऱ्यांचा विरोध; मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत पाठवले... दिलीप कांबळे
ऍग्रो वन

मावळात रिंगरोडला शेतकऱ्यांचा विरोध; मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत पाठवले...

दिलीप कांबळे

पुणे: मावळातील इंदोरी येथील शेतकऱ्यांचा रिंग रोडला विरोध आहे. रिंगरोड रद्द केला नाही तर शेतकऱ्यांनी (Farmers) आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिला आहे. प्रशासनाकडून पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांना दडपविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. आज रिंगरोडच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हुसकावून लावत रिंग रोड (Ring Road) हटाव शेतकरी बचावच्या घोषणाही दिल्या. (Farmers oppose ring road in Maval; Sent back to the officers who came for counting)

हे देखील पहा -

सुदुंबरे, सुदवडी, नाणोली, वराळे आणि इंदोरी हद्दीत येणाऱ्या रिंगरोडसाठी बाधित जमिनींच्या मोजणीस इंदोरी पंचक्रोशी रिंगरोड विरोधी कृती समितीने विरोध (Protest) दर्शविला. वडगाव मावळ भूमी अभिलेख अधिकारी  यांना त्याबाबत लेखी निवेदन दिले. इंदोरी, नाणोली तर्फे चाकण, सुदुंबरे, आंबी आदी गावातून जाणारा 110 मीटरचा प्रस्थापित रिंग रोडला स्थानिक शेतकरी वर्गातून तिव्र विरोध होत आहे. यांमध्ये शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मोजणी करणे, नोटीस दाखल करणे, तसेच प्रकल्प आराखडा तयार करणे आदी प्रकार घडत आहेत.

प्रशासनाकडून पोलीस बळाचा वापर करून प्रकल्प बाधित शेतकऱ्यांवर अन्याय होतोय असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. वडिलोपार्जित जमीन हस्तांतरित केल्या तर सर्व शेतकरी आत्मदहन करण्याचा इशारा प्रशांत ढोरे आणि गवरी पाटील या शेतकऱ्यांनी दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पुण्यातील मेट्रो, विकासकामांचे Pm मोदींकडून उद्घाटन

Sambhajinagar News : खळबळजनक! बदलापूरमधील 'त्याच' शाळेतील विद्यार्थिनी घर सोडून गेली; थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये सापडली

Benefits of Eating Garlic: रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे; वाचून व्हाल थक्क

MP Road Accident: भयंकर! भरधाव बस दगड भरलेल्या डंपरमध्ये घुसली, ९ जण ठार; जेसीबीने पत्रा कापून मृतदेह काढले बाहेर

Mumbai Indians: रोहित शर्मा पलटणची साथ सोडणार? मुंबई इंडियन्स या खेळाडूंना करणार रिटेन

SCROLL FOR NEXT