दुर्दैवी! शेतकरी कुटुंबातील चिमुकल्याचा मांजराने घेतला जीव

कपाटावर चढलेल्या मांजराने विषचा डबा खाली पाडला.
दुर्दैवी! शेतकरी कुटुंबातील चिमुकल्याचा मांजराने घेतला जीव
दुर्दैवी! शेतकरी कुटुंबातील चिमुकल्याचा मांजराने घेतला जीव Saam Tv
Published On

सोमवारी दुपारच्या सुमारास अजय पाटील घराबाहेर होते तर त्यांची पत्नी घरकामात व्यस्त होती. दीड वर्षांचा त्यांचा मुलगा रियांश घरात खेळत होता. कपाटावर चढलेल्या मांजराने विषाचा डबा खाली पाडला. त्यामुळे विष घरात पसरले. खाली खेळत असलेल्या रियांशने विषाने माखलेले तेच हात तोंडात घातले.

दुर्दैवी! शेतकरी कुटुंबातील चिमुकल्याचा मांजराने घेतला जीव
'दारु पिऊन, माझे कपडे काढले'; ९ शिक्षकांसह मुख्याध्यापकावर 'पाेक्साे'

काही वेळाने रियांशची आई घरात आली. तिने चिमुकल्याला उचलून त्याचे हात धुतले. आंघोळही घालून दिली. मात्र, काही वेळानंतर विषाने आपला प्रभाव दाखवला. चिमुकल्याची प्रकृती बिघडल्याने प्रारंभी त्याला खासगी आणि नंतर मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारच्या सुमारास या चिमुकल्याचा मृत्यू झाला.समतानगर परिसरात या धक्कादायक घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com