जालना : जिल्ह्यात Jalana अनेक शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री कुसुम सोलार Solar योजने अंतर्गत ऑनलाइन अर्ज मजूर करण्यात आले आहेत. सात दिवसाच्या आत पैसे भरणा करण्याचा मॅसेज ही पात्र शेतकऱ्याला महाराष्ट्र Maharashtra ऊर्जा विकास अभिकरणा कडून प्राप्त झाला आहे. मात्र शेतकरी ऑनलाईन हप्ता भरण्यासाठी जात असताना तेव्हा मात्र शेतकऱ्यांची नावे प्रतीक्षा यादीत दाखवली जात असल्याने नेमका भरणा करायचा कुठं असा प्रश्न निर्माण झाला आहे. Farmers in confusion over PM Kusum Solar Scheme
ज्या निवड झालेल्या शेतकऱ्यांनी Farmers हप्ता जमा केलाय.त्यांना कोणताच प्रकारची माहिती मिळत नसल्याने शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाल्याने एकच गोधळ उडाला आहे.राज्यात एका दैनिकाच्या अंकात महाकृषी उर्जा अभियान अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. राज्यातील शेकऱ्याना प्रधानमंत्री कुसुम सोलार योजने अंतर्गत ९० ते ९५% अनुदानावर राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३, हजार ८०० शेकऱ्याना या योजनेचा फायदा घेता येणार आहे,त्यामुळे शेकऱ्याना दिवसा सिंचनाची व्यवस्था होणार,या योजनेत क्षमतेनुसार ३,५,७.५, एचपी व अश्वशक्ती एच.पी. डी.सी.चा सौर संच उपलब्ध होणार आहे,.....
त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यानी जाहिराती नुसार या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केले असता त्यांना योजनेत त्यांचा अर्ज मजूर झाल्याचा मॅसेज प्राप्त झाल्याने त्यांनी बँक डी.डी व्दारे तर काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने हप्त्याची भरणा ही केला. मात्र ज्या शेतकऱ्यांनी हा भरणा केला, त्यांना कोणत्याच प्रकारची माहिती प्राप्त होत नसल्याने एकच गोधळ उडाला आहे. Farmers in confusion over PM Kusum Solar Scheme
त्यातच ज्या शेतकऱ्यांनी बँक डी.डी.व्दारे भरणा केलाय.त्यांना प्रतीक्षा यादीत टाकण्यात आल्याने या डी.डी.चे करायचे काय असा मोठा प्रश्न शेतकऱ्या सामोर उभा टाकला आहे, तर काही शेतकऱ्यांची फेक वेबसाईट वर पैशाचा भरणा केल्या मुळे फसगत ही झाली आहे. त्यातच जाहिरातीत दिलेल्या नंबर वर कुणीच उत्तर देत नसल्याने व मेल करून ही कुठलेही उत्तर मिळत नसल्याने हजारो शेतकऱ्यात संभ्रम निर्माण झाला आहे.
Edited By - Amit Golwalkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.