वीज पडून शेतकरी महिला मृत्युमुखी; तीन जण गंभीर जखमी दीपक क्षीरसागर
ऍग्रो वन

वीज पडून शेतकरी महिला मृत्युमुखी; तीन जण गंभीर जखमी

सिताराम गवळी ,दैवशाला कटकटे, शंकर गवळी हे तिघेजण जखमी

दीपक क्षीरसागर

लातूर - औसा तालुक्यातील भादा Bhada येथील शिवारात प्रचंड विजेचा कडकडाट होऊन वीज पडल्याने एक ५५ वर्षीय शेतकरी महिला मृत्युमुखी Death पडली आहे. तिघे जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सध्या सोयाबीन Soyabean कापणीचा हंगाम सुरू असल्याने शेतात आठ जण सोयाबीन काढण्यासाठी गेलेले होते. यावेळी विजेचा प्रचंड कडकडाट होऊन वीज पडून शशिकला सिताराम गवळी वय ५५ वर्ष जागीच मृत्युमुखी पडल्या. तर सिताराम गवळी ,दैवशाला कटकटे, शंकर गवळी हे तिघेजण जखमी झाले.

हे देखील पहा -

जखमी पैकी दोघांना उपचारासाठी औसा येथे हलविण्यात आले आहे. प्रचंड आवाज झाल्याने इतर व्यक्ती भयभीत झाले असून अद्यापही काही जणांना अंगाचा थरकाप सुटला असल्याचे राजेंद्र लक्ष्मण गवळी या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. मयत शशिकला सिताराम गवळी यांच्या पश्चात पती, तीन मुली, एक मुलगा आहे. सदर घटनेचा पंचनामा व मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर भादा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वीज पडून शेतकरी महिला मृत्युमुखी पडल्याने भादा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

SCROLL FOR NEXT