Onions, buldhana, farmers
Onions, buldhana, farmers saam tv
ऍग्रो वन

Khamgaon Farmer News: बुलढाण्याच्या पालकमंत्र्यांना आर्त हाक, आता तरी लक्ष द्याल; शेतक-याने दीड एकरातील कांदा रस्त्यावर फेकला (पाहा व्हिडिओ)

संजय जाधव

Buldhana News : कांद्याला भाव (onion price) मिळत नसल्याने शेतकऱ्याने कांदा रस्त्यावर फेकून दिला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतक-यांमध्ये (farmers) नाराजी पसरली आहे. त्यातूनच खामगाव तालुक्यातील आंबेटाकली येथे एका शेतक-याने दीड एकरातील पाच ट्राॅली कांदा रस्त्यावर फेकून दिला. (Maharashtra News)

गारपीट व अवकाळी पावसाने यावर्षी शेतकऱ्यांचा कांदा मातीत गाढला आहे. काही शेतकऱ्यांचा कांदा गारपीटीने व अवकाळी पावसाने जमिनीतच सडला आहे. मात्र काहींनी कांदा काढून सुद्धा त्याला उत्पादन खर्च निघेल एवढाही भाव मिळत नाहीये. गारपीटीचा मार खाल्ल्याने तो कांदा टिकत नसल्याने चक्क रस्त्यावर कांदा फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

संजय कोल्हे हे आंबेटाकळी येथील शेतकरी यांनी आपल्या दीड एकरात कांदा लागवड केली होती. त्याला जवळपास ७५ हजार एवढा खर्च आला आहे. मात्र अवकाळी पाऊस व गारपीटीने कांदा पिकाने मार खाल्ला.

त्यातून त्यांनी कसा - बसा दीड एकरात पाच टॉली कांदा काढला. मात्र तो गारपीटीने मार खाल्लेला कांदा टिकणार कसा व विकावा तर उत्पादन खर्चही निघणार नाही एवढा भाव आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला आपल्या शेतातील कांदा चक्क रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

Ruby Roman Grapes : ही द्राक्षे तयार करण्यासाठी लागली १४ वर्षे, एका घडाची किंमत आहे १० लाख

Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Raj Thackeray: '5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर...', तो किस्सा सांगत राज ठाकरेंनी केलं नारायण राणे यांचं कौतुक

SCROLL FOR NEXT