Akola News
Akola News Saam Tv
ऍग्रो वन

उन्हाळी सोयाबीनने दिला दगा; शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली जनावरे

अॅड. जयेश गावंडे

अकोला- उन्हाळी सोयाबीनने दगा दिल्याने हतबल झालेल्या एका शेतकऱ्याने आपल्या उभ्या शेतात जनावरे सोडून पीक नष्ट केले. अकोल्यातील दहिगाव गावंडे येथील आशिष प्रकाश काळे या शेतकऱ्याने आपल्या पाच एकर शेतात उन्हाळी सोयाबीनची (Soybean) लागवड केली होती. मात्र वाढत्या उन्हाचा या पिकाला फटका बसला. आशिष सारख्या बहुतांश शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांचा (Farmer) हा प्रयोग फसला आहे. या प्रयोगात झाडाची नुसती वाढ असून फळधारणेचा पत्ताच नाही. तर वाढत्या उन्हामुळे सोयाबीन पीक करपून गेलं आहे. त्यामुळे हतबल होऊन आशिष सारख्या अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या उभ्या पिकात जनावरे चरण्यासाठी सोडली आहेत.

खरिपात लागवड होत असलेले सोयाबीन पीक यावर्षी शेतकऱ्यांनी रब्बीत देखील कायम ठेवत उन्हाळी सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात पेरा केला.अकोल्यातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची लागवड केली.

हे देखील पाहा -

परंतु पेरणी होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला तरी सोयाबीनचे पीक केवळ वाढीस लागले. परंतु पिकाला फळधारणा झाली नाही. तर काही ठिकाणी अकोल्यातील वाढत्या तापमानामुळे पीक करपून गेले. दरम्यान गतवर्षी शेतकऱ्यांना खरिपात सोयाबीन पेरणीसाठी बियाण्याची टंचाई निर्माण झाली होती. शिवाय अनेक शेतकऱ्यांना 11,000 रुपये क्विंटल सोयाबीन बियाणे खरेदी करून खरिपाची पेरणी पूर्ण करावी लागली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे खरेदी करताना मोठी आर्थिक झळ सोसावा लागली होती.

मागील वर्षाची पुनरावृत्ती समोर होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी यावर्षी सजग होऊन सोयाबीन पेरणी केली. पेरणी नंतर पिकाची उगवण क्षमता देखील चांगली होती. शेतकऱ्यांनी ठिबकद्वारे पाणी देऊन पीक जगविले. खरीप हंगामापेक्षाही शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनवर मोठा खर्च केला आहे. परंतु सोयाबीनला शेंगा लागत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकात गुरे व मेंढरे सोडून दिली.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट

Ruchira Jadhav: अवतरली सुंदरी... रुचिराचा मनमोहक साडी लूक!

Rahul Gandhi: सत्तेत आल्यास 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार, आरक्षणावर राहुल गांधींची मोठी घोषणा

Dindori Lok Sabha: आधी थोपटले दंड आता मिळवले हात; दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार

Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT