...अन्यथा ऊसाच्या फडात पेटवून घेत आत्मदहन करेल; शेतकऱ्याचा इशारा  Saam TV
ऍग्रो वन

...अन्यथा ऊसाच्या फडात पेटवून घेत आत्मदहन करेल; शेतकऱ्याचा इशारा

यासंदर्भात जय महेश शुगरच्या व्यवस्थापकांशी संपर्क केला असता बोलण्यास नकार दिला.

विनोद जिरे

बीड : ऊसाचा फड पेटवून देत स्वतः उडी घेऊन आत्मदहण करेल, असा टोकाचा अन संतापजनक इशारा बीडमधील एका शेतकऱ्यांने कारखान्याच्या छळाला कंटाळून दिला आहे. त्याचं कारणंही तसच आहे. कारखान्या विरोधात आंदोलन केले म्हणून शेतकऱ्यांचा तोडणीला आलेला ऊस घेऊन जाणार नाही, असा पवित्र बीडच्या माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथे असणाऱ्या, जय महेश शुगर NSL या साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांनी घेतला आहे. यानंतर शेतकऱ्यांने थेट साखर आयुक्तांना पत्र पाठवले आहे. यासंदर्भात जय महेश शुगरच्या व्यवस्थापकांशी संपर्क केला असता बोलण्यास नकार दिला.

माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील सत्यप्रेम मधुकर थावरे, या शेतकऱ्याने मागील वर्षी जय महेश शुगर NSL पवारवाडी, यांना एफआरपीच्या पैशावरील व्याज द्या, म्हणून अर्ज आणि तक्रारी केल्या होत्या. यावेळी कारखाना व्यवस्थापकाने शेतकऱ्यांकडून व्याज माफीचा अर्ज भरून घेतला होता. सत्यप्रेम थावरे यांनी त्या अर्जावर सही केली नाही. म्हणून ऊस घेऊन जाणार नाही. अशी भूमिका कारखान्याने घेतली आहे. त्यामुळं संतप्त शेतकऱ्याने जय महेश शुगर NSL पवारवाडी यांच्या विरोधात, थेट आयुक्तांचे दार ठोठावले आहे.

माझी ऊस तोडणीची तारीख 9 ऑक्टोबर 2021 होती. मात्र माझ्या अगोदर आणि नंतर तोडणीची तारीख असणारा ऊस कारखाण्याने नेला आहे. मात्र माझा ऊस तोडून नेला नाही म्हणून येणाऱ्या 8 डिसेंबर पर्यंत ऊस तोडून नेला नाही, तर ऊसाचा फड पेटून देऊन त्यात उडी घेऊन मी आत्मदहन करेल. असा इशारा सत्यप्रेम थाकरे यांनी दिला आहे.

जय महेश शुगर पवारवाडी या साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या पैसावरील व्याजा पोटी आठ कोटी रुपये थकवले होते. हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतर हे पैसे द्या, म्हणून हायकोर्टाने आदेशित केल्यानंतर, कारखाना व्यवस्थापकाने शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केली आहे. ऊस तोडणीला आलेला असताना, फक्त कारखान्या विरोधात आंदोलन उभे केले, म्हणून आमच्यासारख्या शेतकऱ्यांना खेळण्याचा घाट कारखाना लावत आहे. त्यामुळं याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. अशी मागणी शेतकरी नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

SCROLL FOR NEXT