दुर्दैवी! अतिवृष्टीमुळे हतबल, बँकेनेही कर्ज नाकारले; शेतकऱ्याची आत्महत्या विनोद जिरे
ऍग्रो वन

दुर्दैवी! अतिवृष्टीमुळे हतबल, बँकेनेही कर्ज नाकारले; शेतकऱ्याची आत्महत्या

गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील घटना

विनोद जिरे

बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीने पहिला बळी घेतल्याचं समोर आलं आहे. अतिवृष्टीमुळे शेतीसह पीक वाहून गेले, तर बँकेने जुने कर्ज थकीत असल्याने नवीन कर्ज नाकारले आहे. यामुळे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून एका 55 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग या ठिकाणी घडली आहे.

हे देखील पहा-

अतिवृष्टी नुकसानीचा हा जिल्ह्यातील पहिलाच बळी आहे. भाऊसाहेब दशरथ पांढरे (वय- 55) वर्ष रा. सिरसमार्ग, ता. गेवराई असे मयताचे नाव आहे. ते अल्पभूधारक शेतकरी होते. घर बांधणीसाठी त्यांनी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. शिवाय सेंट्रल बँकेचे पीक कर्जही घेतले होते. शेतात त्यांनी सोयाबीन आणि कापसाची लागवड केली होती.

मात्र, अतिवृष्टीमुळे पिकासह शेती खरडून वाहून गेली. त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. या नैराश्येतून त्यांनी दुपारच्या सुमारास घरामागील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान नवीन कर्ज मिळावे यासाठी भाऊसाहेब पांढरे हे बँकेत खेटे मारत होते. मात्र, जुने कर्ज थकीत असल्याने बँकेने नवीन कर्जास नकार दिला होता. दुपारी बँकेतून येताच त्यांनी गळफास घेतला आहे. दरम्यान या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : रक्षाबंधनाच्या सुट्टीत भावंडांसोबत फिरायचंय? मुंबईजवळची 'हे' पावसाळी पिकनिक स्पॉट्स ठरतील परफेक्ट

Salman Khan Video : 'बिग बॉस २०' मध्ये मोठा ट्विस्ट; स्वतःच्याच चक्रव्यूहात अडकणार सदस्य, सलमान खानने दिला इशारा, म्हणाला- "तथास्तु-टू"

Maharashtra News Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

Rain Update : राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, मुंबईसह ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

Wakad Tourism: एका दिवसाच्या सुट्टीत फिरून यायचंय? वाकडजवळच्या 'या' ठिकाणांचा अनुभन तुम्ही घेतलाच पाहिजे

SCROLL FOR NEXT