Latur : खाजगी ट्रॅव्हल्स चालकांचे आंदोलन...

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात ट्रॅव्हल्स लावून केलं आक्रोश आंदोलन
Latur : खाजगी ट्रॅव्हल्स चालकांचे आंदोलन...
Latur : खाजगी ट्रॅव्हल्स चालकांचे आंदोलन... दीपक क्षीरसागर

लातूर : कोविड नंतर कसंबसं आपला व्यवसाय सावरण्याचा प्रयत्न करत असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्स चालकांना शासनाचे अन्यायकारक धोरण, ट्राफिक पोलीस, आरटीओ यांचा वारंवार दंडात्मक कारवाईचा बडगा मागे लागला आहे. याला वारंवार सामोरं जावं लागत आहे. यामुळे राज्यभरातील खाजगी ट्रॅव्हल्स मालकांनी लातुरात एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅव्हल्स रॅली काढून आंदोलन करत आपल्या मागण्या शासन दरबारी मांडल्या आहेत.

हे देखील पहा-

कोरोना काळातील सर्व टॅक्स माफ करण्यात यावा, ई- चलन, आरटीओ मेमो, आरटीओ कारवाईच्या नावाखाली प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अन्यायकारक कारवाई थांबवावी. फायनान्स कंपनी कडून होणारी गुंडगिरीचा अटकाव करून, व्यावसायिकांना अभय देण्यात यावे. पोलीस आणि आरटीओ यंत्रणांनी केवळ शिक्षा करणे या उद्देशाने न वागता प्रबोधन व शिक्षण या माध्यमातून अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करावा.

Latur : खाजगी ट्रॅव्हल्स चालकांचे आंदोलन...
Maharashtra Rain Forecast: मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

यासह इतर अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात लातूर, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, नाशिक अश्या विविध जिल्ह्यातील ट्रॅव्हल्स संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनानंतर आरटीओ कार्यालयापर्यंत परत रॅली काढून आरटीओला निवेदन देत ट्रॅव्हलस मालक बबलू तोष्णीवाल आणि महेंद्र पारडे यांच्यासह सर्वांनी आपापल्या वाहनांच्या चाव्या आरटीओच्या हातात दिले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com