अतिवृष्टीने घेतला आणखी एक बळी; 34 वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या विनोद जिरे
ऍग्रो वन

अतिवृष्टीने घेतला आणखी एक बळी; 34 वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अतिवृष्टी, गतवर्षीचा पीकविमा नाही त्यात कर्जबाजारीपणाच्या नैराश्यातून केली आत्महत्या

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात परत एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील खळवट लिंबगावमध्ये, 34 वर्षीय तरुण शेतकऱ्याने, गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली आहे. सिद्धेश्वर धर्मराज फरताडे, (वय- 34) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याच नाव आहे.

हे देखील पहा-

सिद्धेश्वर फरताडे हे अल्पभूधारक शेतकरी तथा ऊसतोड कामगार होते. दरवर्षी ते शेती आणि ऊसतोडी करत आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवित होते. यंदा शेतात सोयाबीन अन पपई आहे. यातील सोयाबीन अतिवृष्टीने गेली, तर पपईवर कीड आल्याने ते देखील गेले. त्यामुळे अतिवृष्टीने झालेलं नुकसान अन त्यात कर्जबाजारीपणा, याचं परिस्थितीच्या समोर हार मानली आणि राहत्या घरी गळफास घेऊन स्वतः चे जीवन संपविले आहे.

या प्रकरणाची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. मयत सिद्धेश्वर फरताडे यांच्या पश्चात पत्नी आणि २ मुले असा परिवार आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढत असल्याने, प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Benefits For Constipation: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक सफरचंद; बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होईल दूर

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Saree To Ghagra : आईच्या साडीपासून बनवा गुजराती स्टाइल घागरा; नवरात्रीत तुमचा लूक दिसेल एकदम खास, वाचा ड्रेपिंगची सोपी पद्धत

WhatsApp New Feature: WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आले भन्नाट फीचर, आता 'या' ट्रिक्सने स्केड्यूल करा मेसेजेस, कसं वापरायचं?

Abhijeet Dipke : "पाकिस्तान चीन करू नका महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे लक्ष द्या" अभिजित दीपिकेंचा एकनाथ शिंदे यांना टोला

SCROLL FOR NEXT