शेतकऱ्यांवर कवडीमोल दराने टोमॅटो विकण्याची वेळ विश्वभूषण लिमये
ऍग्रो वन

शेतकऱ्यांवर कवडीमोल दराने टोमॅटो विकण्याची वेळ

शेतकऱ्यांना कधी कोणते पीक आर्थिक लाभ मिळवून देईल, तर कधी कोणते पीक डोळ्यात अश्रू आणेल, हे काही सांगता येत नाही. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात राब- राबून टोमॅटो या पिकाची लागवड केली.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : शेतकऱ्यांना कधी कोणते पीक आर्थिक लाभ मिळवून देईल, तर कधी कोणते पीक डोळ्यात अश्रू आणेल, हे काही सांगता येत नाही. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात राब- राबून टोमॅटो या पिकाची लागवड केली. परंतु, त्याच पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. जगाचा पोशिंदा असलेल्या, शेतकरी टोमॅटोच्या पिकाने अडचणीत आला आहे. त्याच्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. बाजारात टोमॅटोची विक्री कवडीमोल दराने होत असल्याने, मार्केट मधून घराकडे येत असताना अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यांच्या कडेला फेकून दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात टोमॅटोची लागवड जास्त प्रमाणात झाली आहे. या टोमॅटोच्या पिकाला चांगला भाव येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु, शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फिरले आहे. बाजारात या टोमॅटोची विक्री ३ ते ४ रुपये दराने होत असल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजारात न विकताच घराकडे परत येत असताना रस्त्याच्या कडेला हजारो टन टोमॅटो फेकून दिली आहेत. टोमॅटोची लागवड करीत असताना शेतकऱ्यांना त्यासाठी जमिनीची चांगली मशागत करावी लागते. यानंतर योग्य अंतरावर रोपांची लागवड केली जाते.

हे देखील पहा-

रोप वाढत असताना काही महिन्यात त्याचा वेल तयार होतो. त्यानंतर शेतकऱ्यांना या टोमॅटोची बांधणी करावी लागते. यासाठी बांबू आणि तारांचा वापर केला जातो. या तारांच्या सहाय्याने टोमॅटोची रोपे वाढू लागतात. याची वाढ होत असताना, त्याला टोमॅटोचे फळ येऊ लागते. हे टोमॅटोचे फळ लाल झाल्यानंतर त्याची बाजारात विक्री करण्यासाठी तोडणी केली जाते. टोमॅटोची लागवड ते काढणी या दरम्यान शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा खर्च येत असतो. बाजारात टोमॅटोची विक्री प्रति किलो ३ ते ४ रुपये दराने होत असल्याने, शेतकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पंढरपूर येथील बाजार समितीच्या लिलावात १५ रुपयाला ३ टोमॅटोची कॅरेट विक्री केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. टोमॅटोची अगदी कमी दरात विक्री होत असल्याने, अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. काही शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे घेऊन, टोमॅटोची लागवड केली होती. यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेतातून टोमॅटो बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना मालवाहू टेम्पोच्या भाड्या एवढे ही पैसे शेतकऱ्यांना मिळेना गेले आहेत. टोमॅटो तोडणीसाठी लावलेल्या मजुरांचे पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. जगावे की मरावे असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झाला आहे.

गेल्या २ वर्षापासून कोरोनामुळे बाजारपेठ बंद असल्याने, अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील टरबूज, कलिंगड कवडीमोल दराने विकल्याचे पाहायला मिळाले होते. याचबरोबर शेतकऱ्यांनी अनेक उभी पिके शेतात गाडून टाकली होती. लॉकडाऊन ने शेतकरी अडचणीत आले असताना, टोमॅटोच्या पिकाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मोहोळ- बार्शी रोडला लागून सुकून गायकवाड यांची शेती असून, १ एकर टोमॅटोची लागवड केली आहे. यासाठी त्यांना सव्वा लाख रुपये खर्च आला आहे.

बाजारात टोमॅटोची ३ ते ४ रुपये दराने विक्री होत असल्याने, ते जागेवरतीच नासुन चाली आहेत. टोमॅटो तोडणाऱ्या मजुरांना पैसे देण्यासाठी देखील जवळ पैसे नाहीत. घरची लहान मुले व महिलांना घेऊन टोमॅटोची तोडणी करत आहे. रात्र- दिवस शेतात कष्ट करूनही शेतकऱ्यांना फळ मिळत नाही. शेतकऱ्यांना वालीच उरला नाही. व्यापाऱ्यांच्या एका कॅरेटला १० रुपये भाडे आहे. आम्ही शेतात केलेले कष्ट वायपट मातीत चालले आहे. लाख- सव्वा लाख रुपये मातीत गेले आहेत. नुसता भाव आला- आला म्हणतात पण ऊस, केळी, द्राक्ष याही पिकात तीच परिस्थिती आहे.

शेतकऱ्यांनी पीक घ्यावे कोणते असा प्रश्न निर्माण झाला आहे. गांजाची शेती करावे म्हटले, तर पोलीस लगेच पकडायला येतात. ते त्यांना परवडते. शेतकऱ्यांनी आता काय करावे असा प्रश्न उपस्थित करून शेवटी इलाज नाही. शेती सोडून द्यायची पाळी आली आहे. सर्व भारत देश हे शेतकऱ्यांच्या जीवावर आहे. माझे म्हणणे आहे की, सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. व्यापाऱ्यांनी ही लक्ष द्यावे. भारताचा शेतकरी जर मेला तर ही लोक अन्न-अन्न करून मरतील. सरकारने व्यापाऱ्यावर सुध्दा बंधने आणली पाहिजेत.

आमच्याकडून ३ ते ५ रुपये दराने टोमॅटो खरेदी करून, तिकडे दिल्ली येथे माल नेहून व्यापारी प्रति किलो ४० रुपये दराने विकतात. टोमॅटोला कमी भाव मिळाला असल्याने, अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो नदीत फेकून दिली आहेत. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्याच्याकडेला फेकून दिली आहेत. याची नुकसानभरपाई कोण देणार. एकरा- एकरचा टोमॅटोचा फलाट आहे. सरकार नुसते, नुकसान भरपाई देतो म्हणते परंतु, एक रुपया सुध्दा देत नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : निश्चितच मी विजय होईल- झिशान सिद्दीकी

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

SCROLL FOR NEXT