अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर दुबार खर्चाचे संकट

आतापर्यंत ३ लाख ५५ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रफळावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर दुबार खर्चाचे संकट
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर दुबार खर्चाचे संकटसंजय जाधव
Published On

संजय जाधव

बुलढाणा - खरिपाच्या सुरवातीला समाधानकारक पाऊस Rain झाला त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास 94 टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र आता अतिवृष्ठी मुळे सोयाबीन Soyabean मध्ये तणनाशक फवारणी करूनही शेतकऱ्यांना Farmer निंदन, खुरपण करावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आता हा दुबार खर्चाचे संकट वाढले आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन आणि कपाशीचे पीक घेतले जाते. ज्यामध्ये यावर्षी आतापर्यंत ३ लाख ५५ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रफळावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. वरून सोयाबीनचे पीक हिरवेगार दिसत असले तरी मात्र खोड माशी आणि चक्राभुंगा किटकाने सोयाबीन पोखरली जात आहे.

हे देखील पहा -

त्यासाठी कीटकनाशकांची फवारणी सुरू आहे. तर दुसरीकडे पिकातील तण वाढल्याने शेतकऱ्यांनी तणनाशक फवारणी केली, मात्र जिल्ह्यात कुठे संततधार तर कुठे अतिवृष्ठी सुरू असल्याने, शेतकऱ्यांना सोयाबीन निंदण्याची गरज पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना डबल खर्च करावा लागत आहे.

आधीच खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव केली आणि आता हा परत भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे. सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी नगदी समजले जाणारे पीक आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर दुबार खर्चाचे संकट
अशी भाषा करणाऱ्या लोकांमुळे भाजपाचा अंत होईल

मात्र आता हे महागात पडत असल्याचे चित्र आहे. पेरणी पूर्व मशागती पासून ते सोयाबीन काढणी पर्यंतच्या नांगरणी, पेरणी, दोन - तीन वेळा कीटकनाशक फवारणी, तणनाशक फवारणी, निंदन, सोयाबीन कापणी आणि मळणी या संपूर्ण प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना अंदाजे एकरी १५ हजार रुपये खर्च येत आहे. गेल्या चार - पाच वर्षांपासून सोयाबीन उत्पन्नाची सरासरी पाहिल्यास शेतकऱ्यांचा लागलेला खर्चही निघत नाही आणि दुसरीकडे पीक विमा, पीक कर्ज, नुकसानीची मदत याबाबतीत सर्वच यंत्रणा उदासीन असल्याचे चित्र आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com