dhobli mirchi, capsicum  saam tv
ऍग्रो वन

Dhobli Mirchi Price Drop : सर्वसामान्यांना दिलासा, शेतकरी चिंताग्रस्त; कोथिंबीर, मेथीपाठोपाठ ढोबळी मिरची झाली स्वस्त

Kothimbir Price Drop : कोथिंबीरला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले हाेते. त्यातच मिरचीचा दर ढासळला आहे.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Manmad News : मागील महिन्यात पावसाअभावी मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू या भाज्यांना मोठी मागणी हाेती. परिणामी सर्व भाज्यांचे दर गगनाला भिडले हाेते. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट काेलमडले हाेते. आता सर्व भाज्यांचे दर कमी हाेऊ लागले आहेत. त्यातच ढाेबळी मिरचीचा दर 50 टक्क्यांनी घसरल्याने (Dhobli Mirchi Price Drop In Nashik) शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

अनेक शेतक-यांनी ढाेबळी मिरचीची लागवड केली असतांना सुरवातील ७०० ते ८०० कॅरेटला भाव मिळत हाेता. आता अचानक मिरचीच्या दरात घसरण झाली आहे. ढाेबळी मिरचीचा भाव ३५० ते ४०० रुपये कॅरेटवर आला आहे. दर घसरल्याने शेतक-यांचा हिरमोड झाला आहे. (Maharashtra News)

हताश शेतक-याने कोथिंबीरवर नांगर फिरवला

मागिल महिन्यात कोथिंबीर एका जुडीला १२५ ते १५० रुपयांचा दर मिळत असल्याने अनेक शेतक-यांना चांगला आर्थिक फायदा झाला होता. नाशिकच्या येवला तालूक्यातील भारम येथिल शेतकरी संजय जेजुरकर यांनी मे महिन्याच्या अखेरीस कोथिंबीरची शेततळ्यातील शिल्लक पाण्यावर लागवड केली.

दिड महिन्या नंतर ती काढणीला आलेली असतांना दरा घसरण कोथिंबीरला शेकडा दोनशे रुपयांचा दर मिळाल्याने हताश झालेल्या जेजुरकर यांनी आपल्या शेतातील कोथिंबीर पिकावर नांगर फिरवत कोथिंबीर काढून टाकली.

कोथिंबीरच्या जुडीला 50 पैसे भाव

कोथिंबीरच्या जुडीला 50 पैसे बाजारभाव मिळत असल्याने राज्यातील बहुतांश बाजार समितीत माल तसाच पडून राहत आहे अथवा शेतकरी स्वत: माल तेथेच ठेवून जात आहेत असेही चित्र आहे.

राज्यात सर्वत्र पाऊस सुरू असल्याने भिजलेल्या कोथींबीर, मेथीला व्यापारी हि खरेदी करत नसल्याने हा शेतीमाल मातीमोल किंमतीत विकला जात असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT