संजय राठोड
यवतमाळ : शेतकरी वर्ग आधीच अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. अशात यवतमाळ मधील महागाव तालुक्यातील बेलदरी या गावच्या शिवारात अचानक शेंनद पाझर तलावात पाण्याची पातळी वाढल्याने ओढ्याला पुर आला आहे. यामुळे त्यात तब्बल ६० जनावरांचा कळप वाहुन गेल्याची घटना घडली आहे.
हे देखील पहा-
६० पैकी २० जनावरे जिवंत सुखरूप बाहेर निघाली आहेत तर ४० जनावरांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. पुराच्या पाण्यात डोळ्यासमोर जनावरे वाहुन जात असल्याने गुराखी बंजारा भाषेतून अक्षरश: आक्रोश व्यक्त करतांनाचा व्हिडिओ वायरल होत आहे. महागांव तालुक्यातील बेलदरी शेत शिवारातील ओढ्याला अचानक पुर आल्याने यामध्ये जनावरांना कळपच वाहुन गेला आहे. वैरण करून गावाकडे येत असताना ओढ्यात गाई वाहुन गेल्या आहेत.
वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि त्यातून वाढता कर्जाचा बोजा यामुळे शेतकऱ्यांची मानसिक स्थिती ढासळत असल्याचे यातून दिसत आहे. गेल्या आठवड्यात राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. त्याचा फटका राज्यातील बळीराजांना चांगलाच बसला आहे. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झालं आहे. अनेकांची शेती वाहून गेली. अद्यापही प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले नसल्याची माहिती बेलदरी गावाचे सरपंच कृष्णा आडे यांनी दिली आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.