Sangli Farmer Saam Tv
ऍग्रो वन

Sangli Farmer : परतीच्या पावसाने भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात...

टोमॅटो उत्पादक शेतकरी पंचनामाच्या प्रतीक्षेत

विजय पाटील

सांगली - परतीच्या पावसाने (Rain) भाजीपाला नेस्तनाबूत होत आहे. अति पावसाने टोमॅटोच्या बागा करपा कुजव्या रोगाने खाक झाल्या आहेत. या मुसळधार पावसाने सांगली (Sangli) जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील भाजीपाला शेतकरी (Farmer) उत्पादक संकटात आला आहे. तर अनेकांच्या टोमॅटोच्या बागा पावसाने कोलमाडल्या आहेत. कोलमडलेल्या बागांच्या फळावर करपा बुरशीजन्य रोग येत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी पंचनामाच्या प्रतीक्षेत आहे. (Sangli Agriculture News)

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप परिसरात परतीच्या मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने भाजीपाला उत्पादक संकटात सापडला आहे. अनेक भाजीपाल्यात पाणी साठल्याने कुजून गेला भाजीपाला उत्पादक पुरताच संकटात सापडला आहे. कुरळप परिसरातील भाजीपाला, भात , सोयाबीन, पिकांचे नुकसान झाले तर टोमॅटोची बागा कोलमडली आहेत.

त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. टोमॅटोची बाग कोलमडल्याने कच्चे टोमॅटो तुटून सरीत पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तर राहिलेले 40 टक्के फळ करपा कुजव्या रोगाने बाद होवू लागले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करावे असा आदेश काढला असला तरी अजून संबंधित विभागाकडे आदेश आलेला नाही. त्यामुळे संबंधित विभाग सुस्त असल्याचे चित्र आहे. किमान शासनाकडून याचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Korean Skincare Tips : कोरियन मुलींसारखा नॅचरल ग्लो हवा आहे? महिनाभर खा 'हे' ६ पदार्थ

Maharashtra News Live Update: पाटबंधारे विभागातील 314 कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ

Nagpur : नागपुरात मध्यरात्री गॅस गळतीने हाहाकार! ४० जण रुग्णालयात; या भागात जाण्यास बंदी

मध्यरात्री सरकारी रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बाळांचा होरपळून मृत्यू, ६ गंभीर, ३६ चिमुकल्यांना वाचवले

Medicine Storage Tips : घरात 'या' ७ ठिकाणी कधीच गोळ्या-औषधं ठेवू नका! कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT