गोंदियात फुलतेय ड्रॅगन फळाची शेती; कमवतोय लाखोंचे उत्पन्न
गोंदियात फुलतेय ड्रॅगन फळाची शेती; कमवतोय लाखोंचे उत्पन्न अभिजित घोरमारे
ऍग्रो वन

गोंदियात फुलतेय ड्रॅगन फळाची शेती; कमवतोय लाखोंचे उत्पन्न

अभिजित घोरमारे

अभिजित घोरमारे

गोंदिया : अरे वा! भाताच्या जिल्ह्यात ड्रॅगन फ्रूटचे Dragon Fruit उत्पादन! धानाचे कोठार म्हणून संपूर्ण राज्यात ओळख असलेल्या पुर्व विदर्भातील गोंदिया Gondia जिल्ह्यात प्रयोगशील आणि प्रगतीशिल शेतकरी म्हणून ओळख असलेल्या भालचंद्र ठाकूर यांनी धानाच्या पट्ट्यात सर्वसामान्य नागरीकांना ड्रगन फ्रूट खाता यावा यासाठी ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती Farming करून त्यातून लाखोचा नफासुद्धा कमाविला आहे.

हे देखील पहा-

धान उत्पादकांचा जिल्हा अशी सर्वदूर ख्याती असलेल्या गोंदिया जिल्ह्याची ओळख हळूहळू बदलत चालली आहे. केवळ धानाच्या शेतीवरच अवलंबून न राहता जिल्ह्यातील शेतकरी Farming धानाच्या शेतीला पर्याय शोधत आहेत. त्यात विदेशात पिकणाऱ्या ड्रॅगन फळाची लागवड आपल्याकडील शेतीत करुन त्यातून उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग गोंदिया तालुक्यातील मजितपूर येथील शेतकरी भालचंद्र यांनी केला आहे. परदेशात पिकणाऱ्या फळांची Fruits लागवड आपल्या देशात करून त्याचे उत्पादन घेणे तसे आव्हानात्मक असते.

त्यातच जैविक शेतीच्या क्षेत्रात अग्रेसर राहणारे कृषी व्यवसायिक शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी परदेशी फळाच्या शेतीचा प्रयोग आपल्या 10 एकर शेतात केला. ते फळ म्हणजे ड्रॅगन फळ होय. थायलंड, व्हिएतनाम व श्रीलंकेसारख्या Shrilanka देशात या फळाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील तीन चार वर्षांपासून या फळाची भारतात लागवड केली जात आहे. धान उत्पादनासाठी प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील ठाकूर यांची ड्रगन फळाची यशस्वी शेती केली आहे.

ड्रॅगन फ्रूट हा तसा श्रीमंतांचा फळ म्हणून ओळखला जातो. गोंदिया जिल्ह्याची भाताचा कोठार म्हणून सर्वदूर ओळख असून धानपिक येथील शेतकऱ्यांचा मुख्य आहे. मात्र गोंदियातील प्रगतीशील शेतकरी भालचंद्र ठाकूर आपल्या शेतात नवनवे प्रयोग नेहमीच करीत असतात. आता त्यांनी दहा एकर शेतीत ड्रॅगन फ्रूटची शेती केला आणि यशस्वी करूनसुद्धा दाखविला आहे. कारण धान पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे येथील शेतकरी कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाच्या सावटात सापडतो. तेव्हा ड्रॅगन फ्रूट हा व्हीयतनाम देशाने अतिशय कमी पाणी आणि कमी कालावधीत विकसित केलेली फळाची जात आहे. त्यामुळे कमी पाणी कमी खर्चात ड्रॅगन फळाची बाग फुलविली. सर्वसामान्य नागरीकांना हा फळ कमी खर्चात खाता यावा यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.

तर थायलंड, व्हिएतनाम किंवा श्रीलंका देशात मोठ्या प्रमाणावर उत्पादित Production होत असलेल्या ड्रॅगनची शेती आता गोंदियासारख्या धानाच्या पट्ट्यातही यशस्वीरीत्या करण्यात त्यांना यश आले।त्यांमुळे जिल्ह्यातील लोकांना आता ड्रॅगन फ्रूट चाखता येणार आहे, हे मात्र निच्छित.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT