हवामानाचा अचूक अंदाज घेणारे 'डॉप्लर' मराठवाड्यात उभारले जाणार
हवामानाचा अचूक अंदाज घेणारे 'डॉप्लर' मराठवाड्यात उभारले जाणार Saam TV
ऍग्रो वन

हवामानाचा अचूक अंदाज घेणारे 'डॉप्लर' मराठवाड्यात उभारले जाणार

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : बातमी आहे, साम टीव्हीने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची. कधी दुष्काळ, कधी अवकाळी तर कधी गारपिटीने त्रस्त असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना येत्या काळात हवामानाचा अचूक अंदाज कळणार आहे. मराठवाड्यातील हवामानाची अचूक माहिती घेण्यासाठी औरंगाबादमध्ये १५ कोटी रुपये खर्च करून कायमस्वरूपी डॉप्लर रडार बसवण्यात येणार आहे. या रडारमुळे पावसाचा अचूक अंदाज, हवामानात झालेला बदल, वादळ किंवा गारपिटीचा अंदाज शेतकऱ्यांना लवकर कळू शकेल. मराठवाड्यातील हवामानाच्या अचूक अंदाजासाठी यंत्रणा उभारावी, यासाठी साम टीव्हीने अनेकदा बातम्या देऊन पाठपुरावा केला होता. त्यानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या दिल्लीतील पाठपुराव्याला यश आल्यानं मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

शाळांना मराठवाड्यात गेल्या दहा वर्षांपासून अस्मानी संकटाने शेतकरी हतबल झाला आहे. पीक काढणीला आल्यानंतर ढगफुटीसारखा पाऊस, अतिवृष्टी होत असल्यानं गेल्या तीन वर्षांपासून खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातही सातत्याने गारपीट होत असल्याने शेतकऱ्याला संकटाचा सामना करावा लागतोय. हवामान बदलाच्या स्थितीमुळे पाऊस, वारा आणि ऊन याची ही स्थिती सातत्याने बदलत असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही अंदाज लावता येत नाही. विशेष म्हणजे हवामान विभागाच्या अंदाजामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला. कारण त्यासाठी मराठवाड्यात कुठलीही अचूक माहिती देणारी यंत्रणा नाही. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हवामानाचा अचूक अंदाज घेणारी यंत्रणा मराठवाड्यात उभारावी अशी मागणी सातत्याने होत होती. अखेर केंद्र सरकारकडून त्या मागणीचा विचार करण्यात आलाय. लवकरच औरंगाबाद शहरात डॉप्लर रडार बसवण्यात येणार असल्याचे पत्र केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना मिळाले आहे. डॉ. भागवत कराड यांनी यासाठी पाठपुरावा केल्यानं एक सकारात्मक पाऊल मराठवाड्यासाठी पडले आहे.

औरंगाबादमध्ये सी बँड रडार डॉपलर बसविण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाने परवानगी दिली आहे. यासंदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करून सी बँड डॉपलर रडार संदर्भात मागणी केली होती. या रडारच्या माध्यमातून हवामाना बद्दलची अचूक माहिती मिळणार आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासात हा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एस. रविचंद्रन यांनी औरंगाबादेत सी बँड डॉपलर रडार बसवण्यास संदर्भात नुकतीच मान्यता दिली असल्याचे पत्र दिले आहे. भारतीय हवामान खाते आणि विज्ञान मंत्रालय यांच्या माध्यमातून सी बँड रडार बसविण्यात येणार आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासंदर्भात अत्यंत महत्त्वाची भूमिका सी बँड डॉपलर रडार निभावणार आहे. किमान तीनशे ते चारशे किलोमीटरचा भूभाग किंवा परिघ या रडारच्या नियंत्रणात येणार असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पंधरा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संदर्भात अचूक माहिती या रडारच्या माध्यमातून मिळणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! मुंबईचा विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

Special Report : तुम्हारे पास क्या है? कोल्हेंच्या डायलॉगबाजीने अहमदनगरात वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT