चिमठाणे (धुळे) : शेतात लागवड करण्यात आलेल्या पिकांना आता पाण्याची गरज भासू लागली आहे. यामुळे शेती पिकांना पाणी दिले जात आहे. त्यानुसार वीजपंप सुरू करीत असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना चिलाणे (ता. शिंदखेडा) येथे रात्री घडली.
शिरपूर (Shirpur) तालुक्यातील सावळदे येथील प्रवीण दगडू पाटील (वय ३८) असे घटनेत मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान रविवारी रात्री विहिरीतील वीजपंप सुरू करण्याचा प्रयत्न प्रवीण पाटील करीत होते. पंप सुरु करत असताना तोल गेल्याने प्रवीण पाटील पाण्यात पडले. शेतात एकटे असल्याने व त्यांना बाहेर (Farmer) निघता न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू. घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी सकाळी शेतशिवारात मदतीसाठी धावले.
येथील तरुणांच्या मदतीने शेतकऱ्याला शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण काटे यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी भिकन तुमडू पाटील (वय ५१, रा. चिलाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोनवणे तपास करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.