Dhule Sakri News Saam tv
ऍग्रो वन

Sakri News: वडिलोपार्जित जमीन गेली धरणात; भूमिहिन शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

Dhule News वडिलोपार्जित जमीन गेली धरणात; भूमिहिन शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

साम टिव्ही ब्युरो

साक्री (धुळे) : अक्कलपाडा धरणाच्या प्रकल्पांतर्गत पुनर्वसनात वडिलोपार्जित जमीन गेल्यानंतर (Dhule) भूमिहिन झालेल्या इच्छापूर (ता. साक्री) येथील शेतकऱ्याने (Farmer) आत्महत्या केली. हि घटना रविवारी समोर आली आहे. (Live Marathi News)

इच्छापूर (ता. साक्री) येथील राजेंद्र बुगा मारनर (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. राजेंद्र मारनर यांनी रविवारी (ता. २०) विषप्राशन करत जीवनयात्रा संपवली. त्यांच्यामागे पत्नी तसेच मुले आहेत. त्यांचे नातलग योगेश थोरात यांच्या माहितीवरून साक्री (Sakri) पोलिसांत मृत्यूची नोंद झाली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर इच्छापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दुसऱ्याची शेती करून उदरनिर्वाह 

मारनर यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार भूमिहीन झालेले राजेंद्र मारनर दुसऱ्यांची शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंब चालवण्यासाठी तसेच शेतीच्या कामांसाठी त्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. मात्र याच कर्जाच्या जाचातून त्यांनी रविवारी सायंकाळी विषप्राशन करत जीवनयात्रा संपविली. दरम्यान, या घटनेबाबत गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT